Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये पुन्हा अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा; १८०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांना अटक
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये पुन्हा अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा; १८०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांना अटक

अहिल्यानगर एलसीबीने सातत्याने संगमनेर मध्ये छापेमारी करत अवैध गोवंश कत्तलीचे कत्तलखाने जोरात सुरू असल्याचे समोर आणले आहे. स्थानिक पोलीस याप्रकरणी कारवाई करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2026Updated:10/02/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर संगमनेर मध्ये अवैध गोवंश जनावरांच्या कत्तली सुरू आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून सातत्याने अहिल्यानगर एलसीबीचे पथक संगमनेर मध्ये छापेमारी करत आहे. गेल्या काही दिवसात या पथकाने तीन-चार मोठे छापे टाकत या अवैध कत्तलखान्याची पोलखोल केली आहे. त्यामुळे या अवैध कत्तलखान्यांना नेमके आशीर्वाद कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडक आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी (१० फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास संगमनेरमधील मोगलपुरा भागात ही धाड टाकली.

राजवाडा परिसरातील बुद्धविहारासमोर अतिक कुरेशी आणि सलीम कुरेशी हे गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, काही लोक कत्तल केलेले मांस टेम्पोमध्ये भरताना रंगेहाथ आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून फैज अश्पाक कुरेशी (वय – २२ वर्षे रा. गल्ली नं.०२ मदिनानगर संगमनेर), सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी (वय- २९ वर्षे रा. मोगलपुरा, जुना राजवाडा, संगमनेर), कलीम सलीम सय्यद (वय – ३६ वर्षे रा. मोगलपुरा, जुना राजवाडा संगमनेर), मुलमफरीद जावेद कुरेशी (वय -३२ वर्षे रा. मोगलपुरा जुना राजवाडा संगमनेर), अनस गुलामसरवर कुरेशी (वय-२१ वर्षे रा. अलकानगर संगमनेर), फैसल जाकिर कुरेशी (वय- २० वर्षे रा. गल्ली नं.१ मदिनानगर संगमनेर) व जुनेद आयाज कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर) यांना ताब्यात घेतले तर अतिक उर्फ सोनु रफिक कुरेशी (रा. मोगलपुरा संगमनेर), सलीम रियाज कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर), हाशमी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर) व टाटा टेम्पो क्र. एच.एच.१४ सी.डी.०८३९ चे मालक (नाव माहिती नाही) अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे तब्बल १८०० किलो गोमांस, ५ लाख ५० हजार रुपयांचा टाटा टेम्पो, १२ हजार रुपयांची एक रिक्षा, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी कुऱ्हाड, चाकू व काणस असा एकूण ११ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर एलसीबीने सातत्याने संगमनेर मध्ये छापेमारी करत अवैध गोवंश कत्तलीचे कत्तलखाने जोरात सुरू असल्याचे समोर आनंद येथील अवैध कत्तलखान्यांची पोलखोल केली आहे. अशा स्थितीत स्थानिक पोलीस याप्रकरणी कारवाई करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पोलीस अंमलदारांच्या पथकाने पार पाडली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 853
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाना कारवाई कत्तलखाना छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.