गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या प्रस्तावावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये संगमनेर आणि अकोले तालुक्यातील उपद्रवी घटकांवर संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजूर, घारगाव आणि आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह दोन्ही तालुक्यांच्या सीमा क्षेत्रात प्रवेश मनाई (तडीपारी) करण्याचे आदेश जारी केले आहेत.
हा मनाई आदेश १३ सप्टेंबर २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, घारगाव, आश्वी आणि राजूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी ही प्रभावी कारवाई केली आहे.
या आदेशानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल प्रकाश धोत्रे (वय २०, रा. संजय गांधी नगर), कृष्णा हरीचंद्र गायकवाड (वय २०, रा. संजय गांधी नगर), दत्ता राजू म्हस्के (वय २२, रा. पंपिंग स्टेशन), यश संजय शेटे (वय १९, रा. सौभाग्य मंगल कार्यालय), महेश राजू म्हस्के (वय १९, रा. पंपिंग स्टेशन), रोहित विष्णू पिलगर (वय २०, रा. आंबेडकर नगर), भगवान उर्फ अतुल रतन लहामगे (वय ३०, रा. उपासनी गल्ली), आदित्य शीतलकुमार कानकाटे (वय २०, रा. नेहरू चौक), अथर्व दुर्गेश रासणे (वय २०, रा. नेहरू चौक), अवधूत वसंत जोशी (वय २२, रा. नेहरू चौक), अश्वाक शौकत शेख (वय २२, रा. अकोले नाका), लखन मारुती शिंदे (रा. शिवाजीनगर), कमरअली गुलामजिलानी सौदागर (रा. भारतनगर), गोविंद रामराव नागरे (वय ३७, रा. नेहरू चौक), सुशांत नानालाल पर्वत (रा. निंबाळे) आणि सागर चंदू पवार (वय ३२, रा. घुलेवाडी) यांच्यावर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्सार अब्दुल शेख (रा. हिवरगाव पावसा), पवन विलास बर्डे (रा. पिंपरणे), साहेबराव भिकाजी राहिंज (रा. पिंपरणे), राहुल सुरेश निळे (रा. पिंपळगाव कोंढिरा), अमोल बाळासाहेब शिंदे (रा. म्हेधवण), अर्जुन अण्णा शिंदे (रा. नान्नज दुमाला), नागेश रामनाथ चंद्रमोरे (रा. निमगाव खुर्द), रोहिदास धोंडीबा निळे (रा. नांदुरी दुमाला), संतोष रेवजी शेलार (रा. कोकणगाव), बबन धोंडीबा तारगे (रा. लोहारे), सुभाष विठ्ठल लांडगे (रा. वडगाव लांडगा) आणि सतिष काशिनाथ खेमनर (रा. डिग्रस) यांना बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्षय मारुती वाकचौरे (वय २४, रा. परखतपूर), रोहिदास भाऊसाहेब उघडे (वय ३८, रा. म्हाळाुदेवी ठाकरवाडी), कचरा किसन बनके (वय ४५, रा. खिरविरे), रामदास संतू मोहिते (वय ४५, रा. देवठाण), सिद्धार्थ रमेश चिकणे (वय ३२, रा. डोंगरगाव), उत्तम आनंदा शिंदे (वय ३५, रा. ब्राह्मणवाडा), अनिस बाबू पटेल (वय ५५, रा. ब्राह्मणवाडा), नंदलाल प्रभाकर गोडसे (वय ५०, रा. लहीत बु.), शांताराम नागु पवार (वय ५०, रा. लिंगदेव), दौलत साहेबराव महाले (वय ३४, रा. बेलापूर), राजेश बबन शिंदे (वय ३९, रा. शाहूनगर) आणि ओम प्रकाश आवारी (वय २३, रा. सिडफार्म) यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रम अशोक घाटकर (रा. राजूर), आकाश दिलीप पावबाके (रा. राजूर), नवनाथ सुरेश देशमुख (रा. केळुंगण), सुनिल लक्ष्मण देशमुख (रा. केळुंगण), किसन सुरेश चोथवे (रा. राजूर), रोहिदास पुता बांडे (रा. खडकी), भगवान रामचंद्र मुर्तडक (रा. रंधा), गोरक्षनाथ अशोक अवसरकर (रा. वारंघुशी), संतोष हिरामन घाणे (रा. वारंघुशी), किसन सोना बांडे (रा. खडकी), अरुण पांडुरंग साळवे (रा. आंबित), काळू विठ्ठल भांगरे (रा. मवेशी) आणि खंडू भाऊ भांगरे (रा. एकदरा) यांना हद्दपार करण्यात आले आहे.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक भिमाजी धुळगंड (वय ४३, रा. मांडवे बु.), जालिंदर ममताजी डोलनर (वय ४१, रा. डोलनर वस्ती, मांडवे बु.), सुनिल संभाजी बाचकर (वय २८, रा. मांडवे बु.), बाळू रामभाऊ केदार (वय ४२, रा. वरुडी फाटा), जिवन गोरक्षनाथ खिलारी (वय ४२, रा. साकूर), भारत भाऊसाहेब आगलावे (वय ३६, रा. डोळासणे), सुभाष शांताराम घुले (वय ४२, रा. जांभूत बु.), धीरज शिवाजी मतकर (वय २८, रा. वाफनवाडी, वाई, जि. सातारा) आणि प्रविण लक्ष्मण ईळगेर (वय २५, रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा यामध्ये समावेश आहे.
याशिवाय आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रदिप भाऊसाहेब सातपुते (वय ३६, रा. पिंपरीलोकी अजमपूर), सोमनाथ रघुनाथ वर्पे (रा. वरवंडी), बाबासाहेब रावसाहेब वाघमारे (रा. खळी), भास्कर पांडुरंग पांडे (रा. खांबे) आणि अनिल संपत कांगणे (रा. कांगणवाडी, खळी) या सर्वांवर गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन व्हावे याकरिता परिसराच्या हद्दीत प्रवेश करण्यास कायदेशीर मनाई करण्यात आली आहे.