Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देवतळे, देवगड येथील मंदिरांत चोरी; दानपेट्या फोडून फक्त नोटांवर डल्ला
गुन्हेगारी

देवतळे, देवगड येथील मंदिरांत चोरी; दानपेट्या फोडून फक्त नोटांवर डल्ला

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील देवतळे (देवगाव) आणि देवगड (हिवरगाव पावसा) या दोन गावांमधील श्री खंडोबा मंदिरांमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकताच येथे मोठा यात्रोत्सव पार पडला होता, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी रात्री दोन्ही मंदिरांमधील गाभाऱ्यात प्रवेश करून कटरच्या साहाय्याने दानपेट्या कापल्या आणि त्यातील रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी केवळ कागदी नोटांची चोरी केली असून चिल्लर पैसे मंदिरांतच सोडून दिले आहेत.

या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या दोन्ही मंदिरांमधील अंतर अवघ्या दोन किलोमीटरचे असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चोरी करताना कैद झाले आहेत. फुटेजमधील हालचालींवरून दोन्ही ठिकाणच्या चोऱ्या एकाच टोळीने केल्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. यात्रेच्या सांगतेनंतर लगेचच झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 885
गुन्हेगारी चोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.