Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक राज’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू
प्रशासन

संगमनेर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक राज’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकताच अधिकृत आदेश पारित केला असून, मंगळवारपासून (दि. ९ फेब्रुवारी) या सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'प्रशासक राज' सुरू झाले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये संपत आहे, अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकताच अधिकृत आदेश पारित केला असून, मंगळवारपासून (दि. ९ फेब्रुवारी) या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’ सुरू झाले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे न्यायालयात प्रलंबित असल्याने, जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाअभावी निवडणुका घेणे शक्य नसल्याने शासनाने हा प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

या आदेशानुसार तालुक्यातील अकलापूर, आंबी दुमाला, आबी खालसा, औरंगपूर, भोजदरी, बोटा, चंदनापूरी, चणेगाव, चिखली, चिंचपूर बु., दाढ खुर्द, देवगाव, देवकौठे, डिग्रस, हिवरगाव पठार, हिवरगाव पावसा, जाखुरी, जवळेबाळेश्वर, जवळेकडलग, कऱ्हे, कनोली, कासारा दुमाला, कासारे, कौठे बु., कौठे धांदरफळ, कौठे कमळेश्वर, कोठे खुर्द, कोठे मलकापूर, खळी, खांबे, खंदरमाळवाडी, खांडगाव, राजापुर, खरशिंदे, कोकणगाव, कोंची मांची, कुरण, कुरकुंडी, कुरकुटवाडी, लोहारे, महालवाडी, मालदाड, माळेगाव हवेली, माळेगाव पठार, मंगळापूर, मनोली, मेंढवण, म्हसवंडी, मिरपुर, मिर्झापूर, नांदूर खंदरमाळ, निमगाव बु., निमगाव खुर्द, निमगाव टेंभी, ओझर बु., पळसखेडे, पानोडी, पारेगाव बु., पारेगाव खुर्द, पेमगिरी, पिंपळगाव देपा, पिंपळगाव माथा, पिंपळे, पिंप्री लौकी अजमपूर, पोखरी बाळेश्वर, प्रतापपुर, राजापूर, रायते, रायतेवाडी, समनापुर, संगमनेर खुर्द, सांगवी, सावरचोळ, सावरगाव घुले, सावरगाव तळ, शेडगाव, शिबलापूर, शिंदोडी, शिरसगावधुपे, शिरापूर, सोनेवाडी, सोनोशी, सुकेवाडी, तिगाव, वडगाव लांडगा, वडगाव पान, वनकटे, वरुडी पठार, वरवंडी, वेल्हाळे, झरेकाठी, झोळे, शेंडेवाडी, नान्न्ज दुमाला, सारोळे पठार आणि काकडवाडी या ९७ ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकीय यंत्रणेमार्फत पाहिला जाणार आहे.

मुदत संपल्याने लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात आले असून, गावगाड्याच्या चाव्या प्रशासकांकडे गेल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतरच या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असल्याने, ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना सध्या पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, आगामी निवडणुकांच्या आशेने विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,414
ग्रामपंचायत प्रशासक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.