Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक–पुणे रेल्वे मूळ मार्गेच व्हावी; संगमनेरमधील १५ हजार विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सामाजिक

नाशिक–पुणे रेल्वे मूळ मार्गेच व्हावी; संगमनेरमधील १५ हजार विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विद्यार्थ्यांच्या या पत्र मोहिमेमुळे शासन आता या मूळ प्रस्तावित मार्गाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा मूळ प्रस्तावित संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी आता संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या लढ्यात सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या हक्काच्या रेल्वे मार्गासाठी आवाज उठवला आहे. यामुळे या मागणीला आता खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले असून, तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग संगमनेर, नारायणगाव आणि खेड असा व्हावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातूनच हा मार्ग मंजूर झाला होता आणि तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रेल्वेच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आला. रेल्वे मार्ग बदलण्याच्या या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने तीव्र करण्यात आली आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी याप्रश्नी ठाम भूमिका घेत, ही रेल्वे नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–नारायणगाव मार्गेच पुण्याला जावी, अशी मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी घारगाव येथे सर्व लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक घेऊन शासनाकडे जनतेच्या भावना पोहोचवल्या आहेत. लोकशाही मार्गाने आपला लढा अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी नागरिकांना पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

विकासाचा समतोल राखण्यासाठी हा मार्ग संगमनेरमधूनच नेणे तांत्रिक आणि सामाजिकदृष्ट्या आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या मागणीसाठी बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या पत्र मोहिमेमुळे शासन आता या मूळ प्रस्तावित मार्गाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 417
नाशिक पुणे रेल्वे पत्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.