Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात नशेच्या दोघा सौदागरांना बेड्या; पोलिसांचा दणका, २५ हजाराचा गांजा जप्त!
गुन्हेगारी

संगमनेरात नशेच्या दोघा सौदागरांना बेड्या; पोलिसांचा दणका, २५ हजाराचा गांजा जप्त!

या रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान यासंदर्भातील अधिक माहितीसाठी पोलीस उपनिरीक्षक सावंत यांच्याशी संपर्क केला असता फारशी माहिती मिळू शकली नाही.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

शांतताप्रिय संगमनेर शहराला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या नशेच्या सौदागरांच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. राजापूरच्या गुंजाळवाडी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागात व कुरणमध्ये छुप्या पद्धतीने चालणाऱ्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ९९७ ग्रॅम सुका गांजा जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे नशेच्या छुप्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. मुन्ना अब्बास शेख (वय २६) आणि संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही तरुण संगमनेर परिसरातीलच रहिवासी असून, त्यांनी शहरात अमली पदार्थांचे जाळे पसरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेला आहे.

काही तरुण संशयास्पदरीत्या अमली पदार्थांची विक्री करत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या छाप्यामध्ये पोलिसांनी आरोपींकडून २४ हजार १२५ रुपये किमतीचा ९६५ ग्रॅम आणि ८०० रुपये किमतीचा ३२ ग्रॅम असा एकूण २४ हजार ९२५ रुपयांचा गांजा जप्त केला आहे. अमली औषधे द्रव्य मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(क) आणि २२(ब)(ii)(अ) प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल सागर मच्छिंद्र नागरे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत असून, या रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान यासंदर्भातील अधिक माहितीसाठी पोलीस उपनिरीक्षक सावंत यांच्याशी संपर्क केला असता फारशी माहिती मिळू शकली नाही.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,458
गांजा कारवाई गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.