Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विश्वासघात! बनावट कागदपत्रांद्वारे शेतजमीन नावावर; झोळे येथील पतसंस्थेच्या संचालकांचे ‘काळे’ कारनामे उघड, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा!
गुन्हेगारी

विश्वासघात! बनावट कागदपत्रांद्वारे शेतजमीन नावावर; झोळे येथील पतसंस्थेच्या संचालकांचे ‘काळे’ कारनामे उघड, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा!

खरात कुटुंबाला त्यांच्या जमिनीवर जप्ती येत असल्याची नोटीस प्राप्त झाली, तेव्हा त्यांना या मोठ्या घोटाळ्याचा सुगावा लागला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी – 
सहकार क्षेत्राचा वारसा सांगणाऱ्या संगमनेर तालुक्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे येथील ‘कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या’ संस्थापक अध्यक्षाने आपल्या पदाचा गैरवापर करून चक्क बनावट कागदपत्रांद्वारे ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संस्थापकासह एकूण १४ जणांविरोधात भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक एका दिवसात झालेली नसून, २० फेब्रुवारी २००५ पासून ते १७ फेब्रुवारी २०२६ या तब्बल २० वर्षांच्या काळात हे षडयंत्र रचले गेले होते. सावरगाव घुले येथील रहिवासी अशोक भागा खरात (वय ४७) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. पतसंस्थेचा संस्थापक मधुकर बादशहा वाळे (वय ५०) याने खरात कुटुंबाला कर्जाची गरज असताना गाठले आणि ‘कर्जापोटी केवळ गहाणखत करून घेतो’ असा विश्वास दिला. मात्र, प्रत्यक्षात खरात यांची सावरगाव घुले येथील मालमत्ता बेकायदेशीररीत्या स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी बनावट खरेदीखत तयार केले.
खरात कुटुंबाला त्यांच्या जमिनीवर जप्ती येत असल्याची नोटीस प्राप्त झाली, तेव्हा त्यांना या मोठ्या घोटाळ्याचा सुगावा लागला. त्यांनी तातडीने संगमनेर आणि अहिल्यानगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्यांच्या नावावर असलेली जमीन कागदोपत्री दुसऱ्यांच्या नावे झाल्याचे समोर आले. आरोपींनी सहायक निबंधक कार्यालयातील काही घटकांच्या मदतीने बेकायदेशीर निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेतले आणि वसुली अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरात कुटुंब व त्यांच्या साक्षीदारांना मालमत्ता लिलावाच्या नोटिसा पाठवून मानसिक छळ केला.
पोलिसांनी या प्रकरणात पतसंस्थेच्या संपूर्ण फळीवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुख्य आरोपी मधुकर बादशहा वाळे याच्यासह सरव्यवस्थापक सविता साहेबराव हासे, अध्यक्ष पोपट सोपान एरंडे, उपाध्यक्ष सीताराम निवृत्ती फटांगरे, संचालक शांताराम रेवजी जाधव, संचालिका कुसुम मधुकर वाळे, राधाबाई दत्तू रहाणे, मीराबाई साहेबराव हासे, संचालक मारुती रामकृष्ण वाळे, मच्छिंद्र भिकाजी घुले, गोविंद लक्ष्मण घुले, लिपिक रावसाहेब कारभारी टेकूडे, व्यवस्थापक संजय शिवाजी घुले आणि व्यवस्थापक किरण लहानू घुले (सर्व रा. झोळे, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. या सर्वांनी संगनमत करून खरात कुटुंबाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पीडित अशोक खरात यांनी या अन्यायाविरुद्ध जिल्हा न्यायालय आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आता संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहेत. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,162
फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.