Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजापूर उपकेंद्राची क्षमता दुप्पट; शेतकरी अन् ग्रामस्थांना मोठा दिलासा
राजकारण

राजापूर उपकेंद्राची क्षमता दुप्पट; शेतकरी अन् ग्रामस्थांना मोठा दिलासा

आपल्या भागातील शेतकरी कष्ट करून पीक घेतो, मात्र वीज समस्येमुळे त्याचे नुकसान होऊ नये हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत, आगामी काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने या उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार वाढल्याने शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप वारंवार बंद पडत होते, याचा थेट परिणाम पिकांना पाणी देण्यावर आणि शेती उत्पादनावर होत होता. ही समस्या गंभीर असल्याचे ओळखून आमदार खताळ यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत ट्रान्सफॉर्मरचे क्षमतेत वाढ केली आहे.

आमदार खताळ यांनी केवळ राजापूरच नव्हे, तर तालुक्यातील इतरही उपकेंद्रांकडे लक्ष केंद्रित केले असून, जिथे गरज आहे तिथे १० एमव्हीएचे ट्रान्सफॉर्मर २० एमव्हीए करण्यात आले आहेत. या नियोजित बदलांमुळे ट्रान्सफॉर्मरवर येणारा अतिरिक्त ताण आता कायमचा दूर झाला असून शेतकऱ्यांना हक्काची आणि मुबलक वीज मिळणे सुलभ झाले आहे.

आपल्या भागातील शेतकरी कष्ट करून पीक घेतो, मात्र वीज समस्येमुळे त्याचे नुकसान होऊ नये हीच आपली प्राथमिकता असल्याचे सांगत, आगामी काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण कामामुळे राजापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 582
अमोल खताळ वीज वितरण कंपनी वीज समस्या समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.