Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात नशेबाजांचा उच्छाद: पोलिसांच्या नाकाखाली मृत्यूचा बाजार, तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी
गुन्हेगारी

संगमनेरात नशेबाजांचा उच्छाद: पोलिसांच्या नाकाखाली मृत्यूचा बाजार, तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी

शहरात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ विकणाऱ्या 'मोठ्या माशांच्या' मुसक्या आवळण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची संतप्त चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात एकीकडे पोलीस कडेकोट बंदोबस्त आणि रूटमार्च काढून आपण सज्ज असल्याचे मिरवत असताना, दुसरीकडे गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात नशेबाजांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून किरकोळ कारणावरून इंदिरानगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील रहिवासी आणि रुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहित वाळके याच्यावर अज्ञात इसमाने कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की रोहित वाळके यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला तातडीने संगमनेरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर परिसरातील शेकडो नागरिकांनी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती, यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

शहरात सध्या पोलिसांच्या नाकाखाली ड्रग सारख्या घातक अमली पदार्थाचा, नशा निर्माण करणाऱ्या आणि अवैध धंद्यांचा मोठा बाजार सुरू असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. प्रशासनाकडून अवैध धंद्यांवर लक्ष असल्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्षात शहराच्या कानाकोपऱ्यात नशेच्या गोळ्या, घातक इंजेक्शन्स, एमडी पावडर आणि गांजाची सर्रास विक्री सुरू आहे. या नशेच्या आहारी गेलेले तरुण आता थेट एकमेकांच्या जीवावर उठू लागले आहेत. पोलिसांचे रूटमार्च केवळ देखावा ठरत असून शहरात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ विकणाऱ्या ‘मोठ्या माशांच्या’ मुसक्या आवळण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची संतप्त चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याने पोलिसांकडून कारवाईचा किंवा बाऊ केला जातो मात्र प्रत्यक्षात ठोस कारवाई केली जात नाही.

यामुळे सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सणासुदीच्या काळात अशा प्रकारे दिवसाढवळ्या होणारे हल्ले पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. केवळ नाकाबंदी न करता नशेचा पुरवठा करणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेणे आता काळाची गरज बनली आहे. सध्या संगमनेर शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,538
अवैध धंदे हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.