Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या ‘व्हिजन २.०’ला गती देण्यासाठी नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा सुरू
राजकारण

संगमनेरच्या ‘व्हिजन २.०’ला गती देण्यासाठी नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा सुरू

शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून आधुनिक नागरी सुविधा आणि प्रगत व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:

संगमनेर शहराच्या सुनियोजित विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि ‘व्हिजन २.०’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा सुरू आहे. शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून आधुनिक नागरी सुविधा आणि प्रगत व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे सर्व नगरसेवक व नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि वेगवान निर्णयांची प्रक्रिया समजून घेण्यावर भर देण्यात आला.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, आरोग्य समितीचे सभापती किशोर टोकसे यांच्यासह संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवक, नगरसेविकांचा या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये समावेश आहे.

या अभ्यासादरम्यान प्रामुख्याने नागरी सुविधा केंद्र, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिःसारण प्रकल्प या तीन महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाची सखोल पाहणी करण्यात आली. संगमनेर शहराचा विस्तार वेगाने होत असल्याने कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे या आघाड्यांवर मुंबईचे मॉडेल कसे राबवता येईल, याचा तांत्रिक अभ्यास यावेळी करण्यात आला. तसेच नागरिकांना सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘नागरी सुविधा केंद्रा’च्या कार्यपद्धतीची नगरसेवकांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या अभ्यास दौऱ्यामुळे संगमनेरच्या भावी विकासकामांना एक नवी दिशा मिळणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीही इतर महत्त्वाच्या विभागांना भेटी दिल्या जाणार असून, या अनुभवातून संगमनेरमध्ये अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि अत्याधुनिक प्रशासन राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 442
अभ्यास दौरा मुंबई संगमनेर सेवा समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.