Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा; राजकीय हालचालींना वेग
राजकारण

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा; राजकीय हालचालींना वेग

सलग आठ वेळा निवडून आलेल्या आणि विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवलेल्या या संयमी व मुत्सद्दी नेत्याचे पुनर्वसन करण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या कोट्यातून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत थोरात यांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा विचार सुरू केला असून, त्यामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आले आहे.

१९८५ ते २०२४ अशी सलग ३९ वर्षे संगमनेरचे आमदार राहिलेल्या थोरात यांचा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला. सलग आठ वेळा निवडून आलेल्या आणि विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवलेल्या या संयमी व मुत्सद्दी नेत्याचे पुनर्वसन करण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. थोरात यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला राज्यात फायदा होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असा विचार पक्षश्रेष्ठींकडून केला जात आहे.

बाळासाहेब थोरात यांची महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी असलेले उत्तम समन्वय व सलोख्याचे संबंध पाहता, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या नावाला संमती मिळणे सोपे जाईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. थोरात हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असून अजातशत्रू नेते म्हणून त्यांची ओळख आहे, ज्यामुळे त्यांच्या नावाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,037
बाळासाहेब थोरात राज्यसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.