Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘यशोधन’मध्ये रंगले काव्यसंमेलन; साहित्यिक कवींचा ‘संगमनेर पॅटर्न’ राबवणार – डॉ. सुधीर तांबे
महाराष्ट्र संवाद विशेष

‘यशोधन’मध्ये रंगले काव्यसंमेलन; साहित्यिक कवींचा ‘संगमनेर पॅटर्न’ राबवणार – डॉ. सुधीर तांबे

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो, मात्र केवळ उत्सव न साजरा करता मराठी शाळांना अधिक पाठबळ देणे गरजेचे आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी –
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती असल्याचे सांगत, तिच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक व कवींना सोबत घेऊन आपण एक ‘संगमनेर पॅटर्न’ तयार करू, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात संगमनेरमधील नामवंत कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी काव्यसंमेलन व मराठी भाषा समृद्धीसाठी विशेष चर्चा झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो, मात्र केवळ उत्सव न साजरा करता मराठी शाळांना अधिक पाठबळ देणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई आणि बहिणाबाई अशी मोठी संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राने ही भाषा समृद्ध केली असून भाषा समृद्धीचा वारसा पुढे सुरू राहायला हवा.
दुर्गाताई तांबे यांनी मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी हे या भाषेचे अलंकार असल्याचे सांगून, वाचन मंडळाच्या माध्यमातून संगमनेरमधील वाचन चळवळ अधिक समृद्ध होत असल्याचे नमूद केले. तसेच बाळासाहेब थोरात यांनी आयुष्यभर जपलेल्या वाचन व्यासंगाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
या काव्यसंमेलनाची सुरुवात प्रा. बाबा खरात यांनी ‘श्वापदांना भाळणारी माणसे’ या कवितेने केली, तर प्रा. सुरेश परदेशी यांनी ‘बोलतो मराठी, ऐकतो मराठी’ हे गीत सादर केले. कवी अशोक वालझाडे यांच्या ‘आता वय झाले’ या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले. अनिल देशपांडे यांनी ‘मला जगायला सवड कुठे होती’, नंदकुमार बेल्हेकर यांनी ‘मराठी साहित्य नभांगणी उगवला कुसुमाग्रज तारा’, डॉ. कोमल देशपांडे यांनी महिला सबलीकरणावर आधारित ‘तू आज जगून घे’ आणि विनोद राऊत यांनी पावसावर आधारित कविता सादर केली. एजाज मन्सुरी यांनी ‘माय मराठी’, रमेश शिंदे यांनी ‘ओढ गावाकडची’, डॉ. कोमल भास्कर यांनी ‘आसवानी मी मला विझवू कशाला’, अपर्णा दाणी यांनी ‘पंढरीचा राया’, डॉ. विवेक वाकचौरे यांनी ‘जीवनात आता निवांत झालो’ तर आनंद गायकवाड आणि सुविधा आरासिद्ध यांनीही आपल्या रचना सादर करत संमेलनात रंगत आणली.
यावेळी व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, कवी अशोक वरुडे, दिलीप उदमले, दीपक टाक, अनुराधा आहेर, रामनाथ सातपुते, प्राचार्य रमेश शिंदे, राजाभाऊ भडांगे, डॉ. कोमल देशमुख, प्रा. सुरेश परदेशी, डॉ. कोमल म्हस्के, रश्मीका मारवाडी, बाळकृष्ण महाजन, डॉ. राहुल हांडे, डॉ. राजेंद्र जोरवर, अनिल सोमणी, पत्रकार गौतम गायकवाड, गोरक्ष मदने, सुभाष भालेराव, सुखदेव गाडेकर, सलीम शेख, राजेश जेधे आदींसह विविध साहित्यिक उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्राप्रमाणेच मराठी साहित्यासाठी दिलेले योगदान मोठे असून, त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपत नेहमीच साहित्यिकांचा सन्मान केल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सोमणी यांनी केले, तर आभार डॉ. नितीन भांड यांनी मानले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 277
कवी चर्चा मराठी भाषा गौरव दिन यशोधन साहित्यिक सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.