Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर
व्याख्यान

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

तांबे यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त करताना सांगितले की, भारताकडे प्रचंड बौद्धिक क्षमता असतानाही आज आपण जगात नेमके कुठे आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. समाजात जाणीवपूर्वक मतभेद पेरून माणसा-माणसांत भेद निर्माण केला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त लोकशाहीतच शक्य आहे. विस्कटलेला समाज आणि राज्य संस्था यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे लोकशाही होय. घटनाकारांनी भारतीय समाजमनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली, तीच लोकशाही आज धोक्यात आली आहे की काय, अशी भीती निर्माण करणारी परिस्थिती सध्या देशात पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. या कार्यक्रमाला छात्र भारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना डॉ. बाविस्कर यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीला पूरक ठरतील असे उपाय जितके वाढतील, तितकेच भारतीय समाजमन अधिक सुदृढ होईल. मात्र, सध्या देश आजारी असतानाही तो आजारीच नाही असा आभास निर्माण करणे अधिक घातक ठरत आहे. आजच्या नव्या पिढीने भारताच्या अस्वस्थ मनात नवे प्राण फुंकण्याचे काम केले आहे. आपल्याला जी परिस्थिती अस्वस्थ करणारी वाटते, तीच काही लोकांसाठी ‘अमृतकाळ’ असू शकते; आणि असे वैचारिक मतभेद महात्मा फुलेंच्या काळातही अस्तित्वात होते. सध्याच्या काळात विविध बाबा आणि बुवांना पुढे करून लोकांच्या मनात भ्रामक गोष्टी बिंबवण्याचे काम राजकारणी करत आहेत. सत्ता हाच एकमेव धर्म मानणारे राजकारणी हे प्रत्यक्षात सर्वाधिक नास्तिक असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची तुलना इतर राज्यांशी करताना त्यांनी सांगितले की, १९ व्या शतकात महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही सुधारणावाद सुरू झाला होता. महाराष्ट्रात ही चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली, तर बंगालमध्ये तसे घडले नाही. याच कारणामुळे आज पश्चिम बंगालमध्ये व्याख्यान देणे अशक्यप्राय झाले असून महाराष्ट्रात मात्र नागरी समाज आणि समाजमन अजूनही जिवंत असल्याने हे शक्य होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील सामाजिक स्थिती यापेक्षाही भिन्न असून, एकाच देशात समाजमनाची अशी वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त करताना सांगितले की, भारताकडे प्रचंड बौद्धिक क्षमता असतानाही आज आपण जगात नेमके कुठे आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. समाजात जाणीवपूर्वक मतभेद पेरून माणसा-माणसांत भेद निर्माण केला जात आहे. सध्या जगभरात, अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही माणसाचे जनावरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अमेरिकेतील लोकशाही व्यवस्था या संकटाचा सामना करण्यास सक्षम आहे, तर दुसरीकडे आपल्या देशातील लोकशाहीचे मुख्य स्तंभच कोलमडून पडत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 187
व्याख्यान शरद बाविस्कर सत्यशोधक विचार मंच सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.