Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप
व्याख्यान

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

ज्ञान, भक्ती आणि कलाविष्काराच्या या संगमाने ‘मनशांती व जीवनविकास’ ज्ञानयज्ञाने संगमनेरच्या सांस्कृतिक अवकाशात एक वेगळीच उंची गाठली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश आणि कर्तेपणाच्या अहंकारापासून मुक्ती असेल, तर त्याच कर्माचे रूपांतर साधनेत होते. कर्माचे डोळे म्हणजे ज्ञान आणि अहंकार सोडणे हाच खरा संन्यास आहे, अशा अत्यंत साध्या पण जीवनाला भावस्पर्श करणार्‍या सूत्रातून गीतेतील ज्ञान-कर्म-संन्यासयोगाचा गाभा उलगडत गीता विशारद्, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले.
राजस्थान युवक मंडळाच्या चार दिवसीय ‘मनशांती आणि जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप ज्ञानेश्वरीच्या रसाळ ओव्या, भगवद्गीतेतील श्लोकांचे सहज विवेचन आणि आधुनिक जीवनाशी त्यांची घालून दिलेली सांगड यामुळे आत्मपरीक्षणाचा अनुभव ठरला. पुढील वर्षापासून या व्याख्यानमालेत ‘एक अध्याय, दोन दिवस’ असे निरूपण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही याप्रसंगी जाहीर करण्यात आला.
गेल्या वर्षी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायाचे निरूपण केल्यानंतर यंदा डॉ. मालपाणी यांनी तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायाचा भावार्थ उलगडला. संन्यास म्हणजे भगवे कपडे घालणे किंवा संसार सोडणे नव्हे, तर आसक्ती, अहंकार आणि कर्मफळाची गुलामी सोडणे हा त्यांचा संदेश व्याख्यानाचा केंद्रबिंदू ठरला. अर्जुनाला लाभलेले कृष्णाचे अंतरंग हे केवळ भक्तीमुळे नाही तर त्यांच्यातील निर्व्याज मैत्री आणि विश्वासामुळे होते, हे सांगताना त्यांनी आधुनिक युगात ‘स्पीडपेक्षा डायरेक्शन’ आणि ‘व्यवस्थापनापेक्षा स्वतःचे व्यवस्थापन’ अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
गीतेतील ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…’ या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना डॉ. मालपाणी यांनी सांगितले की, धर्म म्हणजे कर्तव्य आणि धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते. आळस, अहंकार, लोभ आणि असंतोष हीच अंतर्मनातील अधर्माची रूपे आहेत. प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता वेगळी असल्याने पालकांनी मुलांची तुलना करू नये, असा जीवनोपयोगी सल्लाही त्यांनी दिला. व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी दररोज रात्री स्वतःला सात प्रश्न विचारून आत्मसंवाद साधण्याचे आवाहन श्रोत्यांना केले. गीता रणांगण सोडून शांतता शोधायला शिकवत नाही, तर रणांगणात राहून मन शांत कसे ठेवायचे हे शिकवते, असा सार त्यांनी मांडला.
समारोपप्रसंगी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी ज्ञानेश्वरीच्या महिमेचे वर्णन करत पुढील वर्षापासून एका अध्यायाचे दोन दिवस निरूपण करण्याचा मनोदय व्यक्त केला. या वेळी वारकरी संप्रदायाचे भोयी रामकृष्ण महाराज करपे यांच्या हस्ते डॉ. मालपाणी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ओम इंदाणी यांनी मानले, तर सागर मणियार, कृष्णा आसावा, सम्राट भंडारी व कल्पेश मर्दा यांनी वाद्यवृंदाचा सन्मान केला.
या चार दिवसीय विचारसोहळ्याचा समारोप ध्रुव ग्लोबल स्कूलच्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत १०३ पदकांसह विजय मिळविणाऱ्या विद्यार्थिनींच्या नयनरम्य नृत्यवंदनेने झाला. सुरेख वेशभूषा, प्रभावी नेपथ्य आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांना भुरळ घातली. या विजेत्या विद्यार्थिनींचा उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ज्ञान, भक्ती आणि कलाविष्काराच्या या संगमाने ‘मनशांती व जीवनविकास’ ज्ञानयज्ञाने संगमनेरच्या सांस्कृतिक अवकाशात एक वेगळीच उंची गाठली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 206
मन:शांती व जीवनविकास व्याख्यानमाला राजस्थान युवक मंडळ व्याख्यानमाला संजय मालपाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.