Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरात पोलिसांची कारवाई; मोठ्या प्रमाणात गांजासह दोघांना अटक
गुन्हेगारी

संगमनेर शहरात पोलिसांची कारवाई; मोठ्या प्रमाणात गांजासह दोघांना अटक

नासिक तसेच संगमनेर पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना गुंगारा देत होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2026Updated:02/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ किलो ४९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केली असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान सुकेवाडी येथील समनापूर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय २६, रा. घुलेवाडी, संगमनेर) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (वय २१, रा. शिर्डी, ता. राहाता) यांचा समावेश आहे. यातील आरोपी प्रथमेश राऊत हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. तसेच नासिक, संगमनेर पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना गुंगारा देत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ६ लाख ४४ हजार ७०० रुपये किमतीचा २१ किलो ४९० ग्रॅम गांजा, यामध्ये पाने, फुले, काड्या आणि बियांचा समावेश आहे, तसेच ४ लाख ५० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH-04-DR-7802) आणि रिकामी प्लास्टिक पाकिटे असा एकूण ११ लाखांचा ऐवज आहे. आरोपींकडे मानवी मेंदूवर परिणाम करणारा उग्र वासाचा अमली पदार्थ मिळून आल्याने त्यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १८१/२०२६ नुसार अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(क), २२(ब) आणि २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 896
गांजा गांजा कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी…

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.