Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या जाहीर
राजकारण

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या जाहीर

संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
नवी दिल्ली:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी रात्री उशिरा महाराष्ट्रासह देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या मोठ्या फेरबदलामध्ये त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी उपराष्ट्रपती पदी नियुक्ती झालेल्या सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता, मात्र आता राज्याला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत.
संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची आता तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर नंद किशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे. पश्चिम बंगालमध्येही मोठा बदल झाला असून, राष्ट्रपतींनी डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या जागी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांची नियुक्ती करण्यात आली असून, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता तामिळनाडूचे नवे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळतील.
प्रशासकीय स्तरावरही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, तर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांची लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तरनजित सिंग संधू यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 322
राज्यपाल वर्मा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून…

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.