Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भ्रष्ट ‘सिस्टीम’ला आमदार खताळांचा दणका; ९० लाखांच्या हप्त्यावरून घोडके आणि चौधरी यांची अखेर मुख्यालयात रवानगी
राजकारण

भ्रष्ट ‘सिस्टीम’ला आमदार खताळांचा दणका; ९० लाखांच्या हप्त्यावरून घोडके आणि चौधरी यांची अखेर मुख्यालयात रवानगी

आमदार खताळ यांनी हिवाळी अधिवेशनापासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीवर टीकेची झोड उठवली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2026Updated:07/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी-
अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीला पोलीस प्रशासनातीलच काही बड्या माशांचे अभय असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत नावानिशी सांगितल्यानंतर, अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शंकर चौधरी या दोघांचीही तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. आमदार खताळ यांनी हिवाळी अधिवेशनापासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीवर टीकेची झोड उठवली होती.
जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या गुटख्याचा महापूर आला असून, हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवण्यासाठी ‘सिस्टीम’च्या नावाने दरमहा सुमारे ९० लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला होता. केवळ आरोपच नव्हे, तर या वसुलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी विधानसभेच्या पटलावर घेतली होती. खताळ यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र, चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा होत असल्याचे लक्षात येताच खताळ यांनी आपला पाठपुरावा अधिक तीव्र केला होता.
या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, हे सांगताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले होते की, काही पोलीस कर्मचारी हे थेट गुटखा माफियांच्या संपर्कात असून त्यांना गुन्हे लपवण्यासाठी मदत करत आहेत. या तक्रारीची दखल घेत असतानाच, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या दोन्ही अंमलदारांची बदली करण्याचे आदेश काढले. यामध्ये हृदय घोडके आणि शंकर चौधरी या दोघांचाही समावेश असून, त्यांच्यावर असलेल्या आरोपांची आता सखोल विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे पोलीस दलातील त्या गटाला मोठा धक्का बसला आहे. जो वर्षानुवर्षे गुन्हेगारांशी हातमिळवणी करून आपली पोळी भाजून घेत होता. यापूर्वी अमली पदार्थ विक्री प्रकरणात श्यामसुंदर गुजर या अंमलदाराला बडतर्फ करण्यात आले होते, त्याच धर्तीवर आता घोडके आणि चौधरी यांच्यावरही कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेली ही भूमिका केवळ एका विभागापुरती मर्यादित नसून, जिल्ह्याची तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या गुटखा माफियांना मिळणारे राजकीय आणि प्रशासकीय कवच फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाल्याने, त्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई करून आपली पाठ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. या कारवाईने आता जिल्ह्यातील इतरही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बदली नको निलंबन हवे…
दरम्यान या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याऐवजी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र त्यांना जिल्हा मुख्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. एकूण पार्श्वभूमी पाहता त्यांचे रॅकेट सुरू राहण्याची चिन्हे असल्याने किमान त्यांना चौकशी दरम्यान जिल्ह्याबाहेर तरी पाठविणे आवश्यक होते. असा सूर आता नागरिकांमधून उमटत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,873
अधिवेशन अमोल खताळ बदल्या शंकर चौधरी हृदय घोडके
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.