Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजित पवार विमान अपघात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी: रामदास आठवले यांची शिर्डीत मागणी
राजकारण

अजित पवार विमान अपघात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी: रामदास आठवले यांची शिर्डीत मागणी

आज रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामध्ये घातपाताची शक्यता वाटत नसली तरी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आज रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका मांडली. केवळ एखाद्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत, त्यांनी संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची तपासणी करण्याची मागणी केली. खराब हवामान असताना उड्डाणाची परवानगी का दिली आणि विमान दुसऱ्या विमानतळावर का वळवले नाही, या प्रश्नांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आठवले यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना सांगितले की, शिर्डीतून खासदार होण्याची त्यांची इच्छा होती, मात्र सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचे सांगतानाच त्यांनी राहुल गांधींवर जाती-जातीत भेद निर्माण केल्याची टीका केली.
तसेच, आगामी काळात अन्य दोन राज्यांत यश मिळवून पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील नगरसेवकांची संख्या आणि ज्योती वाघमारे यांची राज्यसभा निवड यावरून त्यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचे सूतोवाच केले. दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे दोन्ही देशांशी असलेले चांगले संबंध व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 218
पत्रकार परिषद रामदास आठवले शिर्डी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून…

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.