Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यासाठी ३१ कोटींचा विकासनिधी मंजूर; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
राजकारण

संगमनेर तालुक्यासाठी ३१ कोटींचा विकासनिधी मंजूर; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटी रुपये आणि वेल्हाळे ते राजापूर दरम्यान म्हाळुंगी नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न सुटणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंजूर झालेल्या निधीतून कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५०, चिंचेवाडी-साकूर ते राष्ट्रीय महामार्ग ७१ (मारुती मंदिर), अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक या प्रमुख मार्गांचे काम केले जाणार आहे. तसेच निमगाव बुद्रुक गाव, राजापूर, जोर्वे नाका ते निंबाळे चौफुली, नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापूर, जोर्वे ते वडगाव पान, कवठे कमळेश्वर ते लोहारे, झोळे ते नांदुरी दुमाला, वाघापूर ते जिल्हा महामार्ग (डिग्रस-अंभोरे), चिकणी ते डोंगरगाव, हिवरगाव पठार ते जिल्हा महामार्ग, आणि कोकणगाव ते डोंगरे वस्ती व नवले वस्ती ते जिल्हा महामार्ग या सर्व रस्त्यांच्या विकासाची कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.
या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या या निधीमुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे आता जोमाने होतील. यामुळे केवळ वाहतुकीला गती मिळणार नाही, तर शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळातही तालुक्यातील इतर विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. – अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 293
अमोल खताळ अर्थसंकल्पीय अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

By अनंत पांगारकरJuly 14, 20260

विशेष प्रतिनिधी / मुंबई अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण ताजं असताना, त्याबद्दल रामभक्तांमध्ये संताप…

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.