Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची आमदार खताळ यांची अधिवेशनात मागणी
राजकारण

संगमनेरमध्ये ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची आमदार खताळ यांची अधिवेशनात मागणी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरात ‘मराठी भाषा भवन’ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत केली. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी संगमनेर येथे स्वतंत्र मराठी भाषा भवन उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देत सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी सभागृहातून केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदारसंघातील असल्याचा अभिमान असल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींना नेहमीच चालना मिळत आली आहे.
संगमनेर हे शहर साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळींसाठी ओळखले जाते. अनेक साहित्यिक, कवी, लेखक आणि विचारवंतांनी या शहरातून मराठी साहित्यविश्वात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या शहरात मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास, संशोधन, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी मराठी भाषा भवन उभारण्याची गरज असल्याचे आमदार खताळ यांनी अधोरेखित केले.
मराठी भाषा भवन उभारल्यास येथे साहित्य संमेलन, व्याख्याने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मराठी भाषेच्या अभ्यासासाठी विविध उपक्रम आयोजित करता येतील. तसेच तरुण पिढीमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान आणि जाणीव निर्माण होण्यासही मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
खताळ यांनी केलेल्या या मागणीमुळे संगमनेर शहरातील सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींना नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 211
अमोल खताळ अर्थसंकल्पीय अधिवेशन मराठी भाषा मराठी भाषा भवन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.