Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील पोलीस ठाण्यांच्या समस्यांनी विधानसभेचे लक्ष वेधले; आमदार अमोल खताळ यांनी मांडल्या विविध मागण्या
राजकारण

संगमनेरमधील पोलीस ठाण्यांच्या समस्यांनी विधानसभेचे लक्ष वेधले; आमदार अमोल खताळ यांनी मांडल्या विविध मागण्या

राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली. आंदोलने किंवा राजकीय कारणांमुळे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत शासनाचे सकारात्मक आदेश असतानाही, खालच्या स्तरावरून प्रस्तावांची कार्यवाही रखडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी जोरदार आवाज उठवला. संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ आणि मूलभूत सुविधांची गरज याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आमदार खताळ यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये पोलीस निवासस्थानांच्या दुरवस्थेचा प्रश्न अत्यंत कळीचा ठरला. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यायोग्य राहिलेली नाहीत, ज्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यापूर्वीही हा प्रश्न शासनासमोर मांडूनही अद्याप ठोस आर्थिक तरतूद न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामांसाठी तातडीने अतिरिक्त निधी देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. तसेच घारगाव पोलीस स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शासनाचे आभार मानतानाच, मुळा नदीलगत असलेल्या या ठाण्यातील इतर पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची मागणीही त्यांनी केली.
केवळ इमारतींचे प्रश्नच नव्हे, तर पोलीस दलाचे आरोग्य आणि मनुष्यबळावरही त्यांनी भाष्य केले. समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तैनात असणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे खताळ म्हणाले. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी पडत असल्याने, प्रत्येक पोलीस ठाण्यात लोकसंख्येनुसार पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
📌 दरम्यान, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली. आंदोलने किंवा राजकीय कारणांमुळे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत शासनाचे सकारात्मक आदेश असतानाही, खालच्या स्तरावरून प्रस्तावांची कार्यवाही रखडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकरणांची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन ती तातडीने निकाली काढण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 406
अमोल खताळ अर्थसंकल्पीय अधिवेशन पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे बायपासवरील घुलेवाडी हद्दीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलेट आणि…

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.