Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वीज वितरणाच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचे संगमनेरमध्ये ठिय्या आंदोलन; पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तात्काळ जोडा – डॉ. जयश्रीताई थोरात
आंदोलन

वीज वितरणाच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचे संगमनेरमध्ये ठिय्या आंदोलन; पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तात्काळ जोडा – डॉ. जयश्रीताई थोरात

अखेर मुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी येत्या एक-दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
संगमनेर तालुका व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले कनेक्शन या मुद्द्यांवरून आक्रमक होत युवक काँग्रेसच्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण विभागाच्या कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राज्यभरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवेळी आणि कमी दाबाने वीज मिळत असल्याने सिंचनासह विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे.
विशेषतः गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापूर, खांडगाव यांसारख्या अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या अन्यायाविरोधात डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह अजय फटांगरे, पद्माताई थोरात, प्रमिला अभंग आणि सुमारे १०० कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या मांडला.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, राज्यात उष्णतेची लाट असताना नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, मोठ्या भांडवलदारांची वीज बिले माफ करणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णालय, शाळा आणि शेती या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन महावितरणने विजेचे योग्य वेळापत्रक जाहीर करावे आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
या आंदोलनादरम्यान तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. अखेर मुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी येत्या एक-दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर काँग्रेसच्या वतीने पुकारलेले हे ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 487
आंदोलन काँग्रेस जयश्री थोरात वीज वितरण कंपनी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.