Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर आणि अकोल्यातील दुहेरी हत्याकांड उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून जावयासह मुलगा-सुनेला अटक
गुन्हेगारी

अहिल्यानगर आणि अकोल्यातील दुहेरी हत्याकांड उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून जावयासह मुलगा-सुनेला अटक

धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव परिसरातून बेपत्ता असलेल्या वृद्ध पित्याचा त्यांच्याच मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या जावयाने अकोला जिल्ह्यात आपल्या प्रेयसीचाही खून करून तिचा मृतदेह जाळल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय चाणाक्षपणे तपास करत या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील बापू आनंदा गाढवे (वय ६०) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश बापू गाढवे यानेच मिरजगाव पोलीस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तपासाचे आदेश दिले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, पोलीस अंमलदार भिमराज खर्से, पोलीस अंमलदार राहुल डोके, पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, पोलीस अंमलदार सुनिल मालणकर, पोलीस अंमलदार प्रशांत राठोड आणि पोलीस अंमलदार सतिष भवर यांच्या पथकाला तपासाबाबत आदेश दिले होते.
पथकाने बेपत्ता बापू गाढवे यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली, तेव्हा तक्रारदार मुलगा आकाश याच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या वडिलांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आणि सुनील रामदास राठोड याच्या नावाचा उल्लेख केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील राठोड याचा शोध घेतला असता, तो अकोला जिल्ह्यातील शेगाव येथे आपल्या मित्राच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता, सुनीलने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने जमिनीच्या वादातून बापू गाढवे यांचा खून केल्याची कबुली दिली.
बापू गाढवे यांची शेती विकून त्यातून पैसे मिळवायचे होते, मात्र ते जमीन विकण्यास विरोध करत होते. याच रागातून ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास सुनील राठोड, आकाश गाढवे आणि पायल ऊर्फ आकांक्षा गाढवे यांनी संगनमत करून बापू गाढवे यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्याने त्यांचा मृतदेह जाळून टाकला.
तपासादरम्यान सुनील राठोडने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. गंगाखेड, जि. परभणी) हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, शीतलने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने सुनीलने १६ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचाही खून केला आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसरात तिचा मृतदेह अर्धवट जाळून टाकला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी सुनील राठोड आणि आकाश गाढवे यांना अटक केली असून, त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत. मिरजगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,086
अहिल्यानगर एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.