Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पठारभागाला वरदान ठरणारे ‘कोटमारा धरण’ ओव्हरफ्लो
महाराष्ट्र संवाद विशेष

पठारभागाला वरदान ठरणारे ‘कोटमारा धरण’ ओव्हरफ्लो

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३) दुपारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/08/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील पठारभागाची पाण्याची गरज भागवणारे आणि बोटा परिसरासाठी वरदान ठरणारे कोटमारा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात मुबलक जलसाठा निर्माण झाल्यामुळे बोटा, आंबीदुमाला, कुरकुटवाडी यांसह लगतच्या गावांमधील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३) दुपारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

१९९३ मध्ये उभारणी झालेल्या १५५ एमसीएफटी क्षमतेच्या या धरणावर परिसरातील शेती आणि पिण्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात असताना निसर्गाच्या कृपेने झालेल्या चांगल्या पावसामुळे रविवारी रात्री हे धरण पूर्ण भरून वाहू लागले.

याप्रसंगी बोलताना अजय फटांगरे यांनी सांगितले की, धरण भरल्यामुळे बोटा व परिसरातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची आगामी काळातील पाण्याची चिंता आता दूर झाली आहे.

या जलपूजन सोहळ्यात महिलांनी परंपरेनुसार साडी-चोळी, नारळ आणि फुले वाहुन जलपूजन केले. या प्रसंगी पठार भाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे, बोटा गावचे पोलीस पाटील शिवाजी शेळके, कुरकुटवाडीचे पोलीस पाटील भाऊ शिंदे, सरपंच नूतनताई कुरकुटे, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई कुरकुटे, शकुंतलाताई कुरकुटे, यशवंतीताई नरवडे तसेच प्रमोद कुरकुटे, तुकाराम कुरकुटे, विश्वास कुरकुटे, राहुल कुरकुटे, निखिल कुरकुटे, दत्तात्रय शिंदे यांसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 321
ओव्हर फ्लो कोटमारा धरण जलपूजन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके जळून खाक…

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.