Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बेकायदेशीर धर्मांतराला आता चाप! महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडले ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’; दोषींना होणार ७ वर्षांची जेल!
राजकारण

बेकायदेशीर धर्मांतराला आता चाप! महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडले ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’; दोषींना होणार ७ वर्षांची जेल!

पीडित व्यक्तीसह तिचे आई-वडील, भाऊ, बहीण किंवा रक्ताचे नातेवाईक पोलिसांत तक्रार दाखल करू शकतात आणि अशी तक्रार नोंदवून घेणे पोलिसांवर बंधनकारक असणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2026Updated:14/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:
राज्यातील बळजबरीने, आमिष दाखवून आणि फसवणुकीद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना कायमचा लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ सादर केले असून, यामुळे बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील १० वे राज्य ठरणार आहे.
राज्यात गेल्या काही काळात प्रलोभने आणि फसवणुकीतून धर्मांतर केल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा मुद्दा सरकारने अधोरेखित केला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार, बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या दोषी व्यक्तीने पुन्हा असाच अपराध केला, तर शिक्षेचा कालावधी १० वर्षांपर्यंत आणि दंड १० लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. विशेष म्हणजे, धर्मांतर सक्तीने किंवा अयोग्य मार्गाने केलेले नाही, हे सिद्ध करण्याची सर्व जबाबदारी आरोपी किंवा धर्मांतराचे आयोजन करणाऱ्या संस्थेवरच असेल.
या विधेयकात धर्मांतराच्या प्रक्रियेवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला ६० दिवस आधी सक्षम प्राधिकाऱ्याला नोटीस देणे अनिवार्य असेल, ज्यावर आक्षेप मागवणारी रीतसर सूचना प्रसिद्ध केली जाईल. कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप प्राप्त झाल्यास पोलिसांमार्फत त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच धर्मांतर पूर्ण झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करणे बंधनकारक असेल. या तरतुदींचे उल्लंघन झाल्यास धर्मांतर रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे असतील.
तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेबाबतही कायद्यात स्पष्टता देण्यात आली आहे. पीडित व्यक्तीसह तिचे आई-वडील, भाऊ, बहीण किंवा रक्ताचे नातेवाईक पोलिसांत तक्रार दाखल करू शकतात आणि अशी तक्रार नोंदवून घेणे पोलिसांवर बंधनकारक असणार आहे. केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेला कोणताही विधीपूर्वक विवाह न्यायालयात रद्द ठरू शकतो, तसेच अशा विवाहातून जन्मलेल्या बालकाला आईचा धर्म लागू होईल, अशीही महत्त्वाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 292
गृहराज्यमंत्री धर्मांतर पंकज भोयर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.