Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी क्लब संगमनेरतर्फे संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात ‘रंग बरसे रंगोत्सव’
सामाजिक

रोटरी क्लब संगमनेरतर्फे संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात ‘रंग बरसे रंगोत्सव’

या दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत पुढील वर्षी आणखी मोठ्या आणि अधिक उत्साहपूर्ण स्वरूपात रंगोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावेळी रोटरी क्लब सदस्यांनी व्यक्त केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
रोटरी क्लब संगमनेर आणि दीपक इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत “रंग बरसे रंगोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दि. ९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनी रंग खेळत आनंद वाटण्याचा अनोखा आणि भावनिक क्षण अनुभवला. रंगांच्या उधळणीत विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान पवनकुमार वर्मा यांनी विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या ताज्या सफरचंदांसह विविध फळाहाराचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोटेरियन दीपकजी मणियार (दीपक इंडस्ट्रीज) यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले विविध रंगांचे अत्याधुनिक स्प्रे होते. या स्प्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रंगोत्सव अधिक उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि रोटरी क्लबचे सदस्यही या रंगोत्सवात सहभागी होत सर्वांनी मिळून आनंदाचा अविस्मरणीय क्षण अनुभवला.
यावेळी रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी, सचिव सौरभ म्हाळस, प्रकल्प प्रमुख राजेंद्र खोसे तसेच क्लब संचालक पवनकुमार वर्मा, आनंद हासे, संदीप फटांगरे, भारतभूषण नावंदर, अमित पवार, अजित काकडे, मधुसूदन करवा आदी रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते.
या दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत पुढील वर्षी आणखी मोठ्या आणि अधिक उत्साहपूर्ण स्वरूपात रंगोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावेळी रोटरी क्लब सदस्यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 173
रंग बरसे रंगोत्सव रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.