Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गैरवर्तन भोवलं; संगमनेरच्या ‘या’ माजी पंचायत समिती सदस्याची ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी
राजकारण

गैरवर्तन भोवलं; संगमनेरच्या ‘या’ माजी पंचायत समिती सदस्याची ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी

कोते पाटील यांनी घडलेली सर्व हकीकत सांगून त्यासंदर्भातील ठोस व्हिडिओ पुरावे विनायक राऊत यांच्याकडे सादर केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, विशेष प्रतिनिधी-
साधु-संतांचा अपमान केल्याच्या कारणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिस्तभंगाची कठोर कारवाई करत संगमनेर मधील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
नाथ संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या अवघडपीर सतनाथजी महाराज (चितेगाव, नाशिक) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेनेचे माजी पदाधिकारी अशोक सातपुते यांना चांगलेच महागात पडले आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, अशोक सातपुते यांनी सतनाथजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ही बाब निदर्शनास येताच भाविक आणि शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी तत्काळ शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत साहेब यांची भेट घेतली. कोते पाटील यांनी घडलेली सर्व हकीकत सांगून त्यासंदर्भातील ठोस व्हिडिओ पुरावे विनायक राऊत यांच्याकडे सादर केले.
सादर करण्यात आलेले सर्व पुरावे पाहिल्यानंतर आणि घटनेची शहानिशा केल्यानंतर, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अशोक सातपुते यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसैनिकांना नेहमीच हिंदुत्वाचा विचार आणि देव, देश, धर्माच्या आड येणाऱ्या विघातक शक्तींशी लढण्याचे संस्कार दिले आहेत. शिवसेना नेहमीच साधु-संतांचा आदर करत आली असून, भविष्यातही अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन पक्ष कधीही करणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,911
अशोक सातपुते शिवसेना उद्धव ठाकरे गट सचिन कोते हकालपट्टी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.