Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्र निषेध; लोकशाही हक्क दडपल्याचा सरकारवर आरोप
राजकारण

प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्र निषेध; लोकशाही हक्क दडपल्याचा सरकारवर आरोप

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य समिती या घटनेचा जाहीर निषेध करत असून, पक्ष ठामपणे प्रा. दीपक पवार यांच्या पाठीशी उभा असल्याचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी –
मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा आणि त्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवण्याच्या प्रयत्नांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात बेताल आरोप करून त्यांना शांत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यापुढे सक्रिय विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रा. पवार हे महाराष्ट्रात मराठीला खऱ्या अर्थाने राजभाषा, व्यवहारभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्यासाठी, तसेच मराठी विषय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्यरत असलेले लोकभाषेच्या चळवळीचे महत्त्वाचे नेते व संघटक आहेत. मराठी भाषेचा मुद्दा हिंसक राजकीय अस्मितेत न अडकवता, या विषयावरील सरकारचा खोटेपणा आणि दांभिकपणा उघड करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे, अशा शब्दांत पक्षाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका केली म्हणून प्रा. पवार यांना लक्ष्य करणे, हा भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस सरकारचा लोकशाही हक्क चिरडून टाकण्याच्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे नाटक करून मराठीला इतिहासाच्या देव्हाऱ्यात कायमचे बंद करण्याचे उद्दिष्ट सत्ताधारी बाळगून आहेत.
एकीकडे सर्वसामान्य मराठी कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना जनविरोधी अर्थनीतीची शिकार बनवले जात असताना, दुसरीकडे मराठी भाषकांचे जगणे, रोजगार आणि अस्मिता हे प्रश्न वेगळे नाहीत, अशी मांडणी करणाऱ्या प्रा. पवार यांचा आवाज दडपण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
राज्यात जन सुरक्षा विधेयकासारखे कायदे आणून सरकारविरोधी आवाज दाबण्याचे काम केले जात असून, प्रा. पवार यांच्यावरील आरोप हे कायद्यांचे सर्रास उल्लंघन असल्याचेही पक्षाने नमूद केले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य समिती या घटनेचा जाहीर निषेध करत असून, पक्ष ठामपणे प्रा. दीपक पवार यांच्या पाठीशी उभा असल्याचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 395
अजित नवले दीपक पवार निषेध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.