Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शालेय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; माजी मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी केला तीव्र निषेध, उपचाराचा खर्च एसएमबीटी करणार!
महाराष्ट्र संवाद विशेष

शालेय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; माजी मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी केला तीव्र निषेध, उपचाराचा खर्च एसएमबीटी करणार!

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून, पोलीस प्रशासन आता आरोपीच्या मुसक्या कधी आवळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
वडगाव पान (संगमनेर) येथील एका तेरा वर्षीय शालेय मुलीवर अज्ञात इसमाने केलेल्या निर्घृण ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. या घटनेचा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पीडित मुलीची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे. गुन्हेगाराला तातडीने शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना- या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शालेय विद्यार्थिनीवर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. गुन्हेगार हा कोणत्याही जाती-धर्माचा नसून तो केवळ गुन्हेगार असतो. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने तात्काळ जेरबंद करून त्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळवून दिली पाहिजे.
डॉ. तांबे यांनी घेतली पीडितेची भेट- माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची भेट घेतली आणि तिच्या कुटुंबाला धीर दिला. यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तपासाचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे निंदनीय आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी समाजाने जागृत राहणे आवश्यक असून, शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आता काळाची गरज बनली आहे, असे मत डॉ. तांबे यांनी व्यक्त केले.
उपचारांचा सर्व खर्च ‘एसएमबीटी’ उचलणार- या संकटकाळात पीडित कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. जखमी मुलीवर होणाऱ्या सर्व उपचारांचा खर्च एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार असल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून तिला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून, पोलीस प्रशासन आता आरोपीच्या मुसक्या कधी आवळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 684
ॲसिड हल्ला बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.