Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून संगमनेरच्या रस्ते विकासासाठी ५० लाखांचा निधी मंजूर; नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची माहिती
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून संगमनेरच्या रस्ते विकासासाठी ५० लाखांचा निधी मंजूर; नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

शासन निर्णयानुसार, या मंजूर निधीचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केले जाणार असून सर्व विकासकामे सार्वजनिक ठिकाणीच राबवण्यात येणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/03/2026Updated:20/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांतून रस्ता अनुदानासाठी एकूण १५७.६० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.

या मोठ्या निधीतून संगमनेर शहराच्या वाट्याला ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने आता शहरातील नागरी सुविधांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन निर्णयानुसार, या मंजूर निधीचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केले जाणार असून सर्व विकासकामे सार्वजनिक ठिकाणीच राबवण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील रहिवाशांच्या प्राथमिक गरजा आणि रस्ते विकासाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती पूर्ण ताकदीने कटिबद्ध असल्याचे यावेळी साक्षी सूर्यवंशी यांनी आवर्जून नमूद केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 578
अमोल खताळ निधी साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.