Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

04/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश; उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांकडे सोपविला राजीनामा, नाशिकच्या नराधम ज्योतिषासोबतच्या संबंधांमुळे मुख्यमंत्री आक्रमक
राजकारण

महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश; उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांकडे सोपविला राजीनामा, नाशिकच्या नराधम ज्योतिषासोबतच्या संबंधांमुळे मुख्यमंत्री आक्रमक

संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा आणि महिला आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:
नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रूपाली चाकणकर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे.
खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे आणि त्याच्यासोबतचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून त्या कार्यालयात उपस्थित नव्हत्या आणि आपल्या पथकाच्या संपर्कातही नसल्याचे समोर आले आहे.
नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि इतर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर चाकणकर यांचे खरातसोबतचे काही जुने व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोंमध्ये त्या खरातचे पाय धुताना दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून पुणे आणि इतर शहरांमध्ये त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी चाकणकर यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले असून, महिलांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीनेच अशा आरोपीचे समर्थन करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. चाकणकर यांनी खरातची जाहिरात किंवा समर्थन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले की, पोलिसांच्या तपासावर त्यांचा पूर्ण विश्वास असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी त्यांना खात्री आहे. तथापि, वाढता दबाव आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना पद सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
दुसरीकडे, मुख्य आरोपी अशोक खरात याने पीडित महिलेला तिच्या पतीच्या जीवावर संकट असल्याचे भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. खरात याच्याकडे अनेक हाय-प्रोफाइल ग्राहक येत असल्याची माहिती समोर आली असून त्याच्याकडून अनेक अश्लील व्हिडिओ देखील जप्त करण्यात आले आहेत. सध्या न्यायालयाने खरात याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा आणि महिला आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,145
अशोक खरात राजीनामा रूपाली चाकणकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

By Annant Ppangarkar04/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता…

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.