Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन! रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांकडून ॲसिड हल्ल्यातील पीडितेला आधार
सामाजिक

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन! रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांकडून ॲसिड हल्ल्यातील पीडितेला आधार

केवळ सांत्वन न थांबता, मुस्लिम समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला मोठी आर्थिक मदतही सुपूर्द करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2026Updated:22/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | मोहसीन शेख 
तालुक्यातील वडगाव पान येथे तीन दिवसांपूर्वी एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध केला जात असतानाच, संगमनेर शहरातील मुस्लिम समाजाने रमजान ईदच्या निमित्ताने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मुस्लिम बांधवांनी आज पीडित मुलीच्या निवासस्थानी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचा हात दिला.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे पीडित कुटुंब सध्या मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. अशा कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी संगमनेर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढाकार घेतला. ईदचा सण असतानाही त्याचे औचित्य साधत मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाची विचारपूस केली. या संकटकाळात तुम्ही एकटे नसून संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास यावेळी देण्यात आला. केवळ सांत्वन न थांबता, मुस्लिम समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला मोठी आर्थिक मदतही सुपूर्द करण्यात आली.
यावेळी भावना व्यक्त करताना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, एका निष्पाप मुलीवर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगाराला कायद्याने कठोर शिक्षा दिलीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना या संकटातून सावरण्यासाठी एकत्र येणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी संगमनेर शहरातील मुस्लिम समाजातील विद्यमान व माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जखमी मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,112
ॲसिड हल्ला अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला आर्थिक मदत रमजान ईद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.