Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये बीएलओंच्या मनमानी कारभारावर ‘ह्यूमन इनोवेशन’ आक्रमक; घरोघरी जाऊन काम करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन
सामाजिक

संगमनेरमध्ये बीएलओंच्या मनमानी कारभारावर ‘ह्यूमन इनोवेशन’ आक्रमक; घरोघरी जाऊन काम करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन

सध्या नगरपालिकेची थकबाकी वसुली आणि SIR मोहीम अशी दोन्ही कामे एकाच वेळी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. मात्र, ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे राहणार आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

निवडणूक आयोगाच्या ‘सिस्टिमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना, शहरातील काही बीएलओनी घरोघरी न जाता नागरिकांना कार्यालयात बोलावून मनमानी कारभार सुरू केला असल्याचा आरोप ‘ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ने केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी संगमनेरचे प्रांत अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार बीएलओ यांनी प्रत्यक्ष घराघरांत जाऊन पडताळणी करणे बंधनकारक आहे. मात्र, संगमनेरमध्ये अनेक बीएलओ दूरध्वनीवरून नागरिकांना थेट नगरपालिकेत किंवा ठराविक ठिकाणी बोलावून घेत आहेत. या प्रकारामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. योग्य जनजागृतीच्या अभावामुळे अनेक नागरिक या महत्त्वाच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असून, या कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

पालिकेतील अधिकाऱ्यांना भेटलेल्या संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये शौकत पठाण, जमिर शेख, रफिक सौदागर व युसुफ शेख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिकांचा सहभाग होता.

या प्रकरणावर भूमिका मांडताना प्रशासनाने कामाचा ताण असल्याचे मान्य केले असले तरी, नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे. सध्या नगरपालिकेची थकबाकी वसुली आणि SIR मोहीम अशी दोन्ही कामे एकाच वेळी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. मात्र, ही प्रक्रिया निरंतर सुरू असून, तिचा हा केवळ पहिलाच टप्पा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी म्हणाले की, बीएलओ यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊनच काम करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. ही प्रक्रिया मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यातही सुरू राहणार असल्याने कुणाचेही नाव मतदार यादीतून सुटणार नाही. बीएलओ लवकरच घरोघरी येऊन माहिती संकलित करतील, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,221
SIR ह्यूमन इनोवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

SIR च्या नोटिसा आल्यात, घाबरू नका; दक्ष रहा!नोटीस मिळालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून कॅम्पला उपस्थित राहावे — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर

26/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.