Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा धरण शताब्दी सोहळ्यावर किसान सभेचा बहिष्कार; मागण्या मान्य न झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा
आंदोलन

भंडारदरा धरण शताब्दी सोहळ्यावर किसान सभेचा बहिष्कार; मागण्या मान्य न झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा

या लढ्यात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ताराचंद विघे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे आणि राजाराम गंभीरे आदींनी पुढाकार घेतला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2026Updated:03/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले
भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, राज्य सरकारने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, धरणासाठी विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय किसान सभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विस्थापितांना न्याय मिळेपर्यंत आणि जमिनींचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.
धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींच्या विस्थापनालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळातही या बांधवांना हक्काचे पाणी मिळालेले नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी भंडारदरा धरणाचे पाणी मिळत नसल्याने या भागातील आदिवासी आजही पाण्यापासून वंचित आहेत.
याशिवाय, विस्थापितांना मोबदला म्हणून दिलेल्या जमिनी अद्यापही त्यांच्या नावावर पूर्णपणे झालेल्या नाहीत. अनेक जमिनी अद्याप ‘वर्ग दोन’च्या असून त्या ‘वर्ग एक’ करून आदिवासींना त्यांच्या हक्काची मालकी देण्याबाबत प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे.
या प्रश्नांवर किसान सभेने यापूर्वीही सातत्याने लढा दिला असून, नुकत्याच पार पडलेल्या राजूर-लोणी लाँग मार्चमध्येही या मागण्या प्रकर्षाने मांडण्यात आल्या होत्या. या आंदोलनानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आणि जमीन नावावर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कृतीमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. या विरोधात आता किसान सभेने पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली असून, व्यापक जागृती मोहीम हाती घेतली आहे.
या नियोजित आंदोलनांतर्गत ७ एप्रिल रोजी शेंडी, घाटघर, मुरशेत आणि भंडारदरा या धरणामागील गावांतील हजारो शेतकरी ‘व्हेईकल मार्च’ काढणार आहेत. जलसंपदा विभागाच्या शेंडी येथील कार्यालयावर या दिवशी जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.
निळवंडे उच्चस्तरीय कालव्याच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी किसान सभेने तीन प्रस्ताव सादर केले आहेत. राजुर लोणी लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालयस्तरीय बैठकीत या प्रस्तावांची व्यावहारिकता व तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. या प्रस्तावांच्या तांत्रिक सर्वेक्षणाबाबत मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास जलसंपदा विभाग टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत, मागण्या पूर्ण न झाल्यास शताब्दी कार्यक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा किसान सभेने घेतला आहे. यासंदर्भात अकोले तहसीलदारांसह जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
या लढ्यात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ताराचंद विघे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे आणि राजाराम गंभीरे आदींनी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 524
किसान सभा जलसंपदा विभाग भंडारदरा धरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.