Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ॲसिड हल्ला पीडित मुलीला धीर देण्यासाठी मंत्री आदिती तटकरे धावणार लोणीकडे; विदर्भ दौरा रद्द करून संगमनेरच्या पीडितेची घेणार भेट
सामाजिक

ॲसिड हल्ला पीडित मुलीला धीर देण्यासाठी मंत्री आदिती तटकरे धावणार लोणीकडे; विदर्भ दौरा रद्द करून संगमनेरच्या पीडितेची घेणार भेट

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अद्याप आरोपीचा कोणताही सुगावा पोलीस यंत्रणेला लागत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे विशेष दौऱ्यावर येत आहेत. मंत्री तटकरे यांनी आपला नियोजित विदर्भ दौरा रद्द करून रविवारी थेट लोणी (ता. राहाता) येथील रुग्णालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.
पीडितेच्या भेटीला प्राधान्य
मंत्री तटकरे आज शनिवारी या पिडीत मुलीची व मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार होत्या. मात्र त्यांचा शनिवारचा दौरा अचानक रद्द झाला होता. संगमनेरमधील ॲसिड हल्ला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि पीडित मुलीला मानसिक बळ देण्याच्या उद्देशाने त्यांनी तातडीने आपला दौरा बदलला आहे. पीडित मुलगी सध्या लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, मंत्री तटकरे तिथे जाऊन तिची विचारपूस करणार आहेत. या भेटीदरम्यान त्या पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्याची शक्यता आहे.
असा असेल दौरा 
मंत्री तटकरे या रविवारी सकाळी सुतारवाडी तालुका रोहा येथून वाहनाने सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत लोणी येथे येत आहे. पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्या पुन्हा संगमनेर मार्गे पुणे येथे जाणार आहे.
प्रशासनात खळबळ
मंत्री तटकरे केवळ या एका मुलीच्या भेटीसाठी विशेष दौरे करत असल्याने प्रशासकीय वर्तुळातही या भेटीची मोठी चर्चा आहे. महिलांवरील अन्यायाच्या घटनांबाबत शासन अत्यंत गंभीर असल्याचे यातून दिसून येत आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेची तयारी सुरू झाली आहे.
न्यायाची अपेक्षा
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अद्याप आरोपीचा कोणताही सुगावा पोलीस यंत्रणेला लागत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांच्या या भेटीमुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळणार असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 469
अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला आदिती तटकरे लोणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.