Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खंडोबा देवस्थान ‘क’ वर्ग दर्जासाठी प्रयत्नशील: आमदार अमोल खताळ
धार्मिक

खंडोबा देवस्थान ‘क’ वर्ग दर्जासाठी प्रयत्नशील: आमदार अमोल खताळ

सावरगाव घुले येथे यात्रोत्सवानिमित्त आ. खताळ यांची भेट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश होणे अत्यंत आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव घुले येथील ग्रामस्थांना दिला.
सावरगाव घुले येथे आयोजित खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून महाआरती केली. या कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीत यश मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश यापूर्वीच व्हायला हवा होता, परंतु वन विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. आता या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून, संबंधित विभागांशी समन्वय साधून देवस्थानाला लवकरात लवकर ‘क’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत.
याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सिताराम घुले, सचिव गोरक्षनाथ मदने, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुले, उपसरपंच नामदेव घुले, व्यापारी अमित राठी, सोसायटीचे अध्यक्ष संतोष घुले, भानुदास बोराडे, पत्रकार बाबासाहेब कडू, शरद घुले, सचिन घुले, बाळासाहेब घुले, बन्सी मदने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, अकलापूर आणि सावरगाव घुले या भागात बैलगाडा शर्यतीची परंपरा सर्वप्रथम सुरू झाली आणि ती आजवर जतन केली जात आहे, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. गावामध्ये ‘टँकरमुक्त’ झाल्याचा फलक पाहून विशेष समाधान वाटले. गेल्या सव्वावर्षाच्या कार्यकाळात आपण प्रत्येक गाव आणि वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
खताळ यांनी राजस्थानातील पर्यटन विकासाचे उदाहरण देत सांगितले की, राजस्थान राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे. याच धर्तीवर संगमनेर तालुक्यातही पर्यटनवृद्धीची मोठी संधी उपलब्ध आहे. सावरगाव घुलेसह पठार भागातील धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास केल्यास या भागाला नवीन आर्थिक बळ मिळेल.
यातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊन गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. त्यामुळे देवस्थानांचा विकास, पायाभूत सुविधा आणि पर्यटनदृष्ट्या आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यावर आपला विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 482
अमोल खताळ सावरगाव घुले यात्रा उत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.