Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रा. डॉ. बायसा गुंजाळ यांना ‘रोटरी सक्षम’ तर डॉ. प्रवीण घुले यांचा ‘रोटरी आत्मनिर्भर’ पुरस्काराने गौरव: ‘स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे कार्य गौरवास्पद – गव्हर्नर रो. सुधीर लातुरे
सामाजिक

प्रा. डॉ. बायसा गुंजाळ यांना ‘रोटरी सक्षम’ तर डॉ. प्रवीण घुले यांचा ‘रोटरी आत्मनिर्भर’ पुरस्काराने गौरव: ‘स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे कार्य गौरवास्पद – गव्हर्नर रो. सुधीर लातुरे

संगमनेर रोटरी क्लबचा 'आय केअर हॉस्पिटल' हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांची माफक दरात सेवा करत असून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि दिव्यांग पुनर्वसन या क्षेत्रातील क्लबचे कार्य दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

समाजातील अनेक महनीय व्यक्तींपासून नेहमीच प्रेरणा मिळत असते. पूर्वीची आणि आजची परिस्थिती वेगळी असली तरी, आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्त्वाची ठरते. समाजाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत घेतलेला विचार आणि कृती समाजाला अभिप्रेत जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते. खऱ्या अर्थाने पुरस्कारासाठी सुयोग्य व्यक्ती शोधणे कठीण असते, मात्र संगमनेर रोटरी क्लबने या पुरस्कारांसाठी केलेली निवड सार्थ आणि समाजासाठी पथदर्शक आहे. ‘स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे सामाजिक कार्य अत्यंत गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांनी केले.

येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या सभागृहात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने आयोजित ‘रोटरी सक्षम’ आणि ‘रोटरी आत्मनिर्भर’ पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गव्हर्नर रो. लातुरे बोलत होते. व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या फर्स्टलेडी संगीताताई लातुरे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. डॉ. राजगोपाल तापडिया, असिस्टंट गव्हर्नर रो. अमोल वैद्य, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विश्वनाथ मालाणी आणि सचिव रो. सौरभ म्हाळस यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या विशेष सोहळ्यात अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. बाईसा गुंजाळ यांना ‘रोटरी सक्षम पुरस्कार’ आणि नांदूर खंदरमाळ येथील डॉ. प्रवीण घुले यांना ‘रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रांतपाल लातुरे म्हणाले, प्रा. बाईसा गुंजाळ यांनी स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करून प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण पूर्ण केले आणि आज त्या विद्यार्थ्यांना जे ज्ञानदान करत आहेत, ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तसेच, अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेत वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे डॉ. प्रवीण घुले यांचे कार्यही तरुण पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. 

सत्काराला उत्तर देताना डॉ. बाईसा गुंजाळ आणि डॉ. प्रवीण घुले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या रोटरी सारख्या संस्थेचा हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे भविष्यात अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत क्लबचे अध्यक्ष रो. विश्वनाथ मालाणी यांनी केले, तर सचिव रो. सौरभ म्हाळस यांनी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विधायक उपक्रमांचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी रो. सुधीर लातुरे यांचा परिचय रो. अजित काकडे यांनी करून दिला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन रो. भारतभूषण नावंदर व रो. सुनील घुले यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो. डॉ. किशोर पोखरकर, रो. विकास लावरे, रो. राजेंद्र खोसे, रो. घुले सर, रो. आनंद हासे, रो. डॉ. प्रमोद राजूस्कर, रो. अजित काकडे, रो. समीर शहा, रो. पवनकुमार वर्मा, रो. संकेत काजळे, रो. नरेंद्र चांडक, रो. महेश वाकचौरे आणि रो. योगेश गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास क्लबचे सर्व संचालक मंडळ, सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि पुरस्कारार्थींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यानिमित्त प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांनी क्लबच्या पदाधिकारी व संचालक मंडळाशी संवाद साधून आगामी ध्येयधोरणांवर सविस्तर चर्चा केली. संगमनेर रोटरी क्लबचा ‘आय केअर हॉस्पिटल’ हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांची माफक दरात सेवा करत असून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि दिव्यांग पुनर्वसन या क्षेत्रातील क्लबचे कार्य दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 593
पुरस्कार रोटरी क्लब सुधीर लातुरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar प्रवीण पुरो- घेतलेलं कर्ज फेडणं हे सामान्य कर्जदाराचं कर्तव्य. मात्र येनकेन कारणास्तव हे…

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.