Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऑनलाइन फसवणूक प्रकरणात नाशिकचे आयपीएस दत्ता कराळे, अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे, बाळासाहेब पाटील यांचा सहभाग; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप
राजकारण

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात नाशिकचे आयपीएस दत्ता कराळे, अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे, बाळासाहेब पाटील यांचा सहभाग; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी

राज्यात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून या रॅकेटमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी पुराव्यांसह मांडलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सीबीआयने ८ ऑगस्ट आणि ११ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हे दाखल केले असून नाशिक तसेच इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्यांना अटक केली होती. मात्र, इगतपुरीत सुरू असलेल्या या मोठ्या रॅकेटचा सुगावा स्थानिक पोलिसांना का लागला नाही, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व अधिकारी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कार्यरत असताना तिथेही अशाच प्रकारचे बोगस कॉल सेंटर सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी संदीप सिंह आणि विशाल यादव या आरोपींवर केवळ जुजबी कारवाई करून त्यांना सोडून दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांची बदली नाशिक परिक्षेत्रात झाल्यानंतर त्यांनी पुन्हा याच आरोपींच्या मदतीने रॅकेट सुरू केल्याचे समोर आले आहे. सीबीआयच्या एफआयआरनुसार, हे रॅकेट सुरळीत चालवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोख रक्कम, सोने आणि चक्क क्रिप्टो करन्सीच्या स्वरूपात लाच दिली जात होती.

सपकाळ यांनी पुढे असेही नमूद केले की, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात झालेला आर्थिक व्यवहार आणि या कॉल सेंटरमधील काळा पैसा यांचा काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व व्यवहारांची माहिती राज्य सरकारला असूनही अद्याप दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. गृहमंत्री नेहमीप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांना क्लिन चिट देणार की ठोस कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 568
दत्त कराळे पत्रकार परिषद बाळासाहेब पाटील सोमनाथ घार्गे हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.