Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात
शिक्षण

मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात

विभागातील काही अधिकारी किरकोळ कारणांवरून शिक्षकांना धाक दाखवून त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2026Updated:18/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज, नेवासा: 

राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असून, शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे मराठी शिक्षणाचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. 

नेवासा तालुक्यातील विविध शाळांना दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विदारक स्थितीवर बोट ठेवत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

या दौऱ्यात डॉ. तांबे यांनी अनेक शाळांमधील शिक्षक आणि संस्थाचालकांशी संवाद साधला. शिक्षक भरती प्रक्रिया प्रदीर्घ काळापासून रखडलेली असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शिक्षकांचे मुख्य कार्य अध्यापन करणे असताना, त्यांना वारंवार ऑनलाईन माहिती भरण्यासारख्या अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढताना डॉ. तांबे म्हणाले की, विभागातील काही अधिकारी किरकोळ कारणांवरून शिक्षकांना धाक दाखवून त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे. याशिवाय अनेक शाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरतीही बंद करण्यात आली आहे. 

शाळांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने भौतिक सुविधांचा अभाव निर्माण होत आहे. शासनाने या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मराठी शाळांची अवस्था अधिक बिकट होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 395
शाळा भेटी सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.