Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
महाराष्ट्र संवाद विशेष

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अक्षयतृतीयेच्या दिवशी किंवा वर्षभरात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने 'चाइल्ड हेल्पलाईन १०९८' किंवा 'पोलीस हेल्पलाईन ११२' या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी,
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

 

 

महाराष्ट्र संवाद न्यूज, अहिल्यानगर: 

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहासाठी मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयोमर्यादेचे उल्लंघन करून विवाह लावून दिल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये केवळ मुला-मुलीचे पालकच नव्हे, तर लग्नाचे आयोजक, नातेवाईक आणि या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यासाठी दंडासह कारावासाची देखील तरतूद करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मोहिमेसाठी गावपातळीपासून ते शहरापर्यंत जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम पाहणार असून त्यांना अंगणवाडी सेविका साहाय्यक म्हणून मदत करतील. शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मुख्य सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अधिकारी स्थानिक पातळीवर होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतील.

विशेषतः मंगल कार्यालये, मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारे यांसारख्या प्रार्थनास्थळांच्या प्रमुखांना प्रशासनाने आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही बालविवाहास सहकार्य करू नये. तसेच बँडपथके, डीजे चालक, केटरर्स, फोटोग्राफर आणि विवाह विधी करणाऱ्या धर्मगुरूंनी वयाची खात्री केल्याशिवाय सेवा देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नमूद केले आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी किंवा वर्षभरात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने ‘चाइल्ड हेल्पलाईन १०९८’ किंवा ‘पोलीस हेल्पलाईन ११२’ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या
१८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण थांबते आणि आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. समाज म्हणून आपण सर्वांनी मिळून संगमनेर तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
— जयश्री जाधव (संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग)

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 453
जयश्री जाधव पंकज आशिया बालविवाह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.