Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील भोंदू बाबाच्या ‘साम्राज्या’ला महावितरणचा दणका; वीज चोरीप्रकरणी पावणेदोन लाखांचा दंड
गुन्हेगारी

संगमनेरमधील भोंदू बाबाच्या ‘साम्राज्या’ला महावितरणचा दणका; वीज चोरीप्रकरणी पावणेदोन लाखांचा दंड

विशेष म्हणजे, ज्या सोशल मीडियाचा वापर करून या भोंदू बाबाने आपल्या व्यवसायाची जाहिरात केली, तोच सोशल मीडिया त्याला नडला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ आश्रमाचा सर्वेसर्वा भोंदू बाबा गडगेबाबा याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. पोलीस कारवाईत आश्रम सील झाल्यानंतर आता महावितरणनेही या भोंदू बाबाला दणका दिला असून, वीज चोरी प्रकरणी सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. 

अधिकृत मीटरला बायपास करून ही वीज चोरी केली जात असल्याचे तपासात उघड झाले असून, आठवडाभरात दंडाची रक्कम न भरल्यास बाबावर वीज चोरीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

गेल्या तीन दशकांपासून अडल्या-नडल्या लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या या बाबाच्या काळ्या कर्तृत्वाच्या कथा आता एकामागून एक समोर येऊ लागल्या आहेत. सुरुवातीच्या काळात गवंडी काम करणारा आणि सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या बांधणारा हा तोतया बाबा चार एकरच्या विस्तीर्ण परिसरात कोट्यवधींच्या मालमत्तेवर डोलारा उभा करून बसला होता. स्वतःच्या आश्रमात लाखो रुपये किमतीच्या सिंहासनावर बसून तो रुग्णांवर उपचार करण्याचे थोतांड माजवत असे. आपण पैसे घेत नसल्याचा आव आणणाऱ्या या बाबाने होम-हवनाच्या नावाखाली प्रत्येकी ११ ते ५१ हजार रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पावती मागणाऱ्यांना ‘अन्नदान वर्गणी’च्या पावत्या देऊन त्याने लोकांची दिशाभूल केली आहे.

नाशिकमधील कुप्रसिद्ध भोंदू बाबा अशोक खरात याच्याप्रमाणेच गडगेबाबानेही ठिकठिकाणी जमिनींची खरेदी केल्याची चर्चा असून, या अफाट संपत्तीचा विनियोग त्याने कुठे केला, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासोबतच आश्रमात येणाऱ्या महिलांशी त्याने काही गैरवर्तन केले आहे का, या दिशेनेही तपास सुरू असून पीडितांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या बाबाला घेऊन आश्रमाची झडती घेण्यात आली, तेव्हाही त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत जुन्याच गुर्मीत वागण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, ज्या सोशल मीडियाचा वापर करून या भोंदू बाबाने आपल्या व्यवसायाची जाहिरात केली, तोच सोशल मीडिया त्याला नडला आहे. इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर मंत्राने कॅन्सरची गाठ विरघळवण्याचे खोटे दावे करणारे व्हिडिओ त्याने प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओंमुळे राज्यभरातून रुग्ण त्याच्याकडे आकर्षित झाले खरे, पण याच व्हिडिओंनी तो अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांच्या रडारवर आला. गेली ३०-३५ वर्षे बिनबोभाटपणे सुरू असलेला हा लुटमारीचा धंदा अखेर सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासामुळेच उघडकीस आला आणि भोंदू बाबाच्या पापाचा घडा भरला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 739
दंड भोंदू गडगे महाराज वीज चोरी संगमनेर तालुका पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.