Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » परदेशी समितीचा अहवाल जाहीर करा; किसान सभेची राज्य सरकारकडे आग्रही मागणी
राजकारण

परदेशी समितीचा अहवाल जाहीर करा; किसान सभेची राज्य सरकारकडे आग्रही मागणी

जर सरकारला जुनेच निकष राबवायचे होते, तर नवीन समिती स्थापन करून वेळ आणि पैसा का खर्च केला, असा थेट सवाल किसान सभेने उपस्थित केला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी:

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अटी व शर्ती निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, हा अहवाल तातडीने चर्चेसाठी सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या शिफारसी आणि अभ्यासावर व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वारंवार कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी या समितीने नेमक्या कोणत्या शिफारसी केल्या आहेत, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. सध्या अशी चर्चा आहे की, समितीच्या अटींमुळे असंतोष निर्माण होऊ नये म्हणून सरकार २०१७ आणि २०१९ च्या जुन्याच निकषांवर कर्जमाफी देण्याचा विचार करत आहे. जर सरकारला जुनेच निकष राबवायचे होते, तर नवीन समिती स्थापन करून वेळ आणि पैसा का खर्च केला, असा थेट सवाल किसान सभेने उपस्थित केला आहे. जुन्याच अटी लागू केल्यास गेल्या वेळी ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला, त्यांना याही वेळी न्याय मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

विशेषतः नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मागील कर्जमाफीत केवळ प्रोत्साहनपर अनुदान देऊन बोळवण करण्यात आली होती. यावेळी हा अन्याय दूर करून नियमित कर्जदारांनाही थकबाकीदार शेतकऱ्यांइतकाच लाभ देण्यात यावा, अशी मागणी डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित आणि डॉ. अजित नवले यांनी केली आहे. तसेच मागील योजनेत वगळण्यात आलेली पॉलिहाऊस, शेडनेट आणि इमूपालन यांसारखी शेतीपूरक कर्जे यंदाच्या कर्जमाफीत समाविष्ट करणे आवश्यक आहे.

यंदाच्या कर्जमाफीसाठी ३० सप्टेंबर २०२५ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, २०२५ च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी संकटात आहेत. केवळ थकबाकीदारांनाच लाभ मिळाल्यास अतिवृष्टीबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे ही मुदत वाढवून ३० जून २०२६ पर्यंत करण्यात यावी, जेणेकरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी आणि परदेशी समितीच्या शिफारसींवर चर्चा घडवून आणूनच पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 185
अजित नवले अहवाल किसान सभा परदेशी समिति
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.