Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पात्र महिलांची संख्या १ कोटी ८९ लाखांवर, ५४ लाख अर्ज अपात्र
प्रशासन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पात्र महिलांची संख्या १ कोटी ८९ लाखांवर, ५४ लाख अर्ज अपात्र

सध्या पात्र महिलांचा आकडा १ कोटी ८९ लाख झाला असला तरी, अंतिम संख्या निश्चित होण्यासाठी अजून एक-दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:

राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचा टप्पा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाला असून, आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची मुदत संपल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी एकूण २ कोटी ४३ लाख बहिणींनी नोंदणी केली होती, मात्र सखोल पडताळणीनंतर तब्बल ५४ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

योजनेच्या पारदर्शकतेसाठी गेल्या दीड वर्षांपासून विविध मार्गांनी निकषांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, निकषात बसत नसतानाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सरकारी कर्मचारी असलेल्या महिला आणि काही ठिकाणी पुरुषांनीही महिलांच्या नावे अर्ज केल्याचे पडताळणीत उघड झाले. मार्च अखेरपर्यंत पात्र महिलांची संख्या १ कोटी ७५ लाख होती, परंतु राज्यातील अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे सरकारने ई-केवायसीसाठी एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या अतिरिक्त एका महिन्यात १४ लाख महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी चुकून ‘सरकारी कर्मचारी’ असल्याचा उल्लेख केलेल्या १४ लाख महिलांनी या महिनाभरात आपली चूक सुधारून योग्य माहिती सादर केल्याने त्यांचा समावेश आता पात्र यादीत झाला आहे.

मार्चअखेर प्रलंबित असलेल्या २६ लाख ३४ हजार महिलांपैकी बहुतेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या पात्र महिलांचा आकडा १ कोटी ८९ लाख झाला असला तरी, अंतिम संख्या निश्चित होण्यासाठी अजून एक-दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच काटेकोर पडताळणीचे संकेत दिले होते, त्यानुसार आता ही गाळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 350
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.