Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या; अहिल्यानगरला आता मुम्मका सुदर्शन एसपी
प्रशासन

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या; अहिल्यानगरला आता मुम्मका सुदर्शन एसपी

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आता अहिल्यानगर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करत २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सोमनाथ घार्गे यांची मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी रवानगी झाली आहे, तर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आता अहिल्यानगर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतील.

या बदल्यांच्या सत्रात जालना येथून अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षक पदी, अमरावती ग्रामीणचे सिगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी आणि नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उप आयुक्त पदी, तर संदीप घुगे यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक कार्यालयात स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बदल्यांच्या या यादीत ठाणे ग्रामीणचे धोंडोपत एस. स्वामी यांची नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी, वाशिमचे अनुज मिलिंद तारे यांची पुणे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये आणि नागरी हक्क संरक्षण विभागाचे अनुराग जैन यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. लोहमार्ग पुणे येथून अश्विनी सानप यांची नंदुरबारला, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची जालन्याला, तर पुणे शहरचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची लोहमार्ग पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे निकेश खाटमोडे यांची वाशिम येथे, जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची चंद्रपूर येथे आणि अमरावती ग्रामीणचे पंकज कुमावत यांची परभणी येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीणला, परभणीचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुजाल यांची मालेगावला, तर फोर्स वनचे गजानन राजमाने यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

तसेच दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची अमरावती येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे सर्व आदेश ३० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 925
अहिल्यानगर एसपी आयपीएस बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.