Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन ‘ऑन ड्युटी’; ३० टँकर्सद्वारे तहानलेल्या गावांना दिलासा! संगमनेर, पारनेरला प्राधान्य
प्रशासन

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन ‘ऑन ड्युटी’; ३० टँकर्सद्वारे तहानलेल्या गावांना दिलासा! संगमनेर, पारनेरला प्राधान्य

या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर:

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांवर सतत देखरेख ठेवली जात असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४ गावे आणि १६२ वाड्या-वस्त्यांना ३० टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे.

या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. एकूण ६४ हजार ५८६ नागरिक या टँकर सुविधेवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने टँकरच्या खेपांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले असून मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण केल्या जात आहेत. सुमारे ९६.७९ टक्के इतके खेपांचे प्रमाण असल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध होत आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील १२ विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. यापैकी तीन जलस्रोत थेट गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी तर नऊ स्त्रोत टँकर भरण्यासाठी वापरले जात आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदारांना अतिरिक्त खाजगी जलस्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकारही बहाल करण्यात आले आहेत. तसेच टँकरमधील पाण्याची गळती किंवा चोरी रोखण्यासाठी विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून टँकर प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

वाढत्या उष्णतेच्या लाटेचा विचार करता आरोग्य विभागानेही खबरदारी घेतली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणीटंचाईचे संकट पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून कोणत्याही परिस्थितीत पाणीटंचाई जाणवू नये यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 298
टँकर पाणीटंचाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.