Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १२ वर्षांनंतर बलात्कार प्रकरणाचा निकाल; पुराव्याअभावी सातही आरोपींची संगमनेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
न्यायालय

१२ वर्षांनंतर बलात्कार प्रकरणाचा निकाल; पुराव्याअभावी सातही आरोपींची संगमनेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) या खटल्याचा निकाल दिला. आरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/05/2026Updated:09/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल १२ वर्षे चाललेल्या एका महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) या खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल भैय्याजी बागडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. आरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. सुजाता गोडसे यांनी सहकार्य केले.

या प्रकरणाची पार्श्वभूमी २०१४ सालातील आहे. पीडित मुलगी १७ वर्षे ६ महिने वयाची असताना, आरोपी राहुल बागडे याने तिला लग्नाचे आणि सुखी आयुष्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता. या काळात पीडिता गर्भवती राहिली आणि ऑगस्ट २०१५ मध्ये ती पुन्हा आपल्या पालकांकडे परतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले होते. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (२)(एन), ३६३, ३६६(अ), ३४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे पीडित मुलगी, तिचे वडील, आई आणि वैद्यकीय अधिकारी अशा एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. पीडित मुलीने न्यायालयात साक्ष देताना आपण आरोपीला ओळखत नसल्याचे सांगितले आणि तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, तिने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६४ अंतर्गत दिलेला जबाबही नाकारला. पीडितेच्या पालकांनीही आपल्या साक्षीमध्ये आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा दिला नाही, उलट त्यांनी आरोपीने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप फेटाळून लावला.

न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, केवळ पीडित आणि तिच्या पालकांनी दिलेली नकारात्मक साक्षच नव्हे, तर सादर करण्यात आलेला डीएनए अहवालही आरोपींना दोषी ठरवण्यासाठी अपुरा ठरला आहे. रक्ताचे नमुने कोणाच्या उपस्थितीत घेतले आणि ते पीडित व आरोपींचेच होते का, याबाबत ठोस पुरावा नसल्यामुळे डीएनए चाचणीचा निष्कर्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मुख्य आरोपी राहुल बागडे, इंदिरा बागडे, वनिता बागडे, नरेंद्र गजभिये, प्रगती गजभिये आणि नीता पानतावणे (सर्व रा. नागपूर) या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

तर आरोपी भैय्याजी बागडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावरील खटला आधीच बंद करण्यात आला होता. तर मुख्य आरोपी राहुल बागडे हा तुरुंगात होता. न्यायालयाने या निकालासोबतच आरोपींचे जामीन रोखे रद्द करण्याचे आणि मुदतीनंतर या प्रकरणातील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,688
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय निकाल बलात्कार सीमा काळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.