Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गर्भलिंग निदान रॅकेट: आतापर्यंत दोन डॉक्टरांसह १२ जणांना अटक; पुणे कनेक्शन आले समोर
गुन्हेगारी

गर्भलिंग निदान रॅकेट: आतापर्यंत दोन डॉक्टरांसह १२ जणांना अटक; पुणे कनेक्शन आले समोर

काही महिलांनी दिलेल्या जबाबानुसार, लिंग निदान झाल्यानंतर तीन महिलांचे गर्भपात करण्यात आले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/05/2026Updated:09/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर:
लोणीच्या पिंपरी निर्मळ परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत १० मे पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या तपासात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा संबंधित गर्भवती महिलांच्या पतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तपासाची व्याप्ती आता पुण्यापर्यंत पोहोचली असून नेवासा येथील मुख्य आरोपी डॉक्टरने ज्यांच्याकडून हे मशिन खरेदी केले होते, त्या पुण्याच्या दोन आरोपींना लवकरच कागद घेऊन पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाला एका गोपनीय बातमीवरून वाचा फुटली होती. पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कॅनॉल जवळील एका खोलीत महिलांकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेऊन बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लोणी पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत सुरुवातीला डॉ. राहुल आबासाहेब भणगे आणि अभिजीत दिलीप भुसाळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कारसह एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून, या रॅकेटमध्ये श्रीरामपूर येथील आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे आणि प्रदीप ढगे व निलेश भवर या एजंट्सचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. यातील डॉक्टर कुटे याला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
तपासात असे समोर आले आहे की, नेवासा येथील डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांनी गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरले जाणारे मशिन पुणे येथील दोन व्यक्तींकडून खरेदी केले होते. पोलीस लवकरच या दोन्ही पुणेकर आरोपींना ताब्यात घेणार आहेत.
या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. एजंट साधारण ८ ते १० गर्भवती महिला गोळा व्हायची वाट पाहत असत. ठराविक संख्या झाल्यानंतर एक वेळ आणि दिवस निश्चित करून महिलांना त्यांच्या पतीसह बोलावले जात असे. तिथे आल्यावर प्रथम रोख रक्कम स्वीकारली जात होती. त्यानंतर महिलांच्या पतींना किंवा नातेवाईकांना एका ठिकाणी थांबवून, एजंट त्या सर्व महिलांना स्वतःच्या चारचाकी वाहनातून दुसऱ्या एका अज्ञात ठिकाणी घेऊन जात असत. तिथे गुप्तपणे चाचणी केल्यानंतर पुन्हा महिलांना त्यांच्या नातेवाईकांकडे आणून सोडले जात असे. या कामासाठी डॉक्टरला १० हजार रुपये आणि एजंटला प्रत्येकी ३ हजार रुपये मिळत होते.
पोलिसांनी आतापर्यंत अनेक महिलांची ओळख पटवली असून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही महिलांनी दिलेल्या जबाबानुसार, लिंग निदान झाल्यानंतर तीन महिलांचे गर्भपात करण्यात आले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे गर्भपात अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्यात एजंट्सच्या मदतीने केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोठ्या कारवाईमुळे अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या रॅकेटमध्ये आणखी किती मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 580
अवैध गर्भपात अवैध गर्भलिंग निदान पुणे कनेक्शन पोलीस कारवाई बेकायदा गर्भलिंग निदान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.