Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर
न्यायालय

संगमनेरमधील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी या प्रकरणातील सर्व चारही अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पंचायत समिती मारहाण प्रकरणी अभिषेक थोरात आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी या प्रकरणातील सर्व चारही अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस पक्षाचे नेते शरद नाना थोरात व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि पंचायत समिती मधील एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, अर्जदारांच्या वतीने ॲड. शोण दिपक थोरात यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.

त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, एका महिलेने पंचायतसमिती मधील एका अधिकाऱ्याकडे आपल्या पगाराची मागणी केली असता, संबंधित अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला असल्याची तिची तक्रार होती. उलट, त्या अधिकाऱ्यास त्याच्या गैरकृत्याचा जाब विचारण्यासाठी शरदनाना थोरात गेले असता त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेनंतर जेव्हा सदर महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली, तेव्हा राजकीय दबावामुळे पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदविण्यास नकार दिला.

महिलेची तक्रार दाखल करून घ्यावी या मागणीसाठी शेकडो महिलांना संगमनेर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करावे लागले होते. तरी देखील तिची तक्रार तिच्या सांगण्याप्रमाणे नोंदविण्यात आलेली नाही. तसेच सदरचा गुन्हा हा राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आला असल्याचे ॲड. थोरात यांनी त्यांच्या युक्तिवादातून कोर्टासमोर मांडले. यावेळी ॲड. थोरात यांना ॲड. प्रमोद शिंदे, ॲड. अजिंक्य शिंदे, ॲड. आकाश जाधव यांनी सहकार्य केले.

दुसरीकडे, सरकारी वकिलांनी या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. अर्जदारांनी सरकारी नोकराला कामापासून रोखले आणि त्यांना मारहाण केली, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तपासासाठी अर्जदारांना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत आरोपींना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. न्यायालयाने अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, शिवामृत बोखारे व एका महिलेस अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या निर्णयामुळे शरद नाना थोरात यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,642
अटकपूर्व जामीन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

22/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.