Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात; इतिहासात प्रथमच तालुक्याला ‘शून्य’ टक्के पीक विमा
राजकारण

सत्ताधाऱ्यांकडून संगमनेरच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात; इतिहासात प्रथमच तालुक्याला ‘शून्य’ टक्के पीक विमा

शेतकऱ्यांच्या या क्रूर थट्टेविरोधात आता संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकरी एकवटले असून, आगामी काळात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकास कामांत अग्रस्थानी असलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला पूर्णपणे डावलण्यात आले असून, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या पदरी ‘शून्य’ टक्के पीक विमा पडला आहे. हा प्रकार म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी खेळलेला एक राजकीय डाव असल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे.

या संदर्भात आनंद वर्पे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि विस्तारित आहे. पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विविध विभागांत विभागलेल्या या तालुक्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आजवर कायमच पीक विमा आणि इतर शासकीय मदतीचे कवच लाभले. मात्र, गेल्या दीड वर्षात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे संगमनेरच्या विकासकामांना खीळ बसली असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हक्काच्या मदतीतही जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पीक विम्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास संगमनेरवर झालेला अन्याय स्पष्टपणे अधोरेखित होतो. जिल्ह्यात एकूण ११८ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून, त्यामध्ये शेजारील राहता तालुक्याला १३ कोटी, कोपरगावला ९ कोटी, एकट्या श्रीरामपूरला १७ कोटी, राहुरीला ६ कोटी आणि अकोले तालुक्याला १ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, संगमनेर तालुक्याच्या वाट्याला एक रुपयाही न आल्याने सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे.

सध्याचे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री केवळ जाहिरातबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विकासाचा आभास निर्माण करत असून, प्रत्यक्षात मात्र जमिनीवर कोणतेही ठोस काम दिसत नाही, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून केवळ प्रसिद्धीसाठी काकडवाडी सारख्या ठिकाणी टँकर पाठवून लगेच बंद करण्यात आले. याउलट, राजहंस दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत पठार भागातील तहानलेल्या वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवून शेतकऱ्यांना आधार दिला आहे. धार्मिकता आणि जातीभेदाच्या नावाखाली राजकारण करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याने सामान्य जनता होरपळून निघत आहे.

याच विषयावर बोलताना ज्येष्ठ शेतकरी पांडुरंग गुंजाळ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली केवळ ‘टक्केवारी’चे राजकारण सुरू असून, टक्केवारी वाढली असली तरी सामान्य शेतकऱ्याची मात्र मोठी वाट लावली गेल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या क्रूर थट्टेविरोधात आता संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकरी एकवटले असून, आगामी काळात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 731
अन्याय पिक विमा मदत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.