Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये एसीबीचा धमाका! मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजारांची लाच घेणारा खाजगी इसम रंगेहात जाळ्यात; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये एसीबीचा धमाका! मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ५ हजारांची लाच घेणारा खाजगी इसम रंगेहात जाळ्यात; गुन्हा दाखल

रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने खाजगी इसम नितीन खर्डे याला रंगेहात पकडले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई करत ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका खाजगी इसमाला रंगेहात पकडले आहे. मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
नाशिक एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. नितीन किसन खर्डे (वय २९ वर्षे, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार हे जेसीबी मशीनच्या साहाय्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करतात. ८ जून २०२६ रोजी आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदाराला तलाठी कार्यालय येथे बोलावून घेतले होते. तिथे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर कामाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना, खाजगी इसम नितीन खर्डे याने त्यांना गाठले. शेत जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरळीत चालवण्यासाठी आणि कोणतीही अडचण न येण्यासाठी त्याने मंडळ अधिकारी यांच्याकरिता ५,००० रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली. इतकेच नव्हे तर, ही लाचेची रक्कम न दिल्यास तक्रारदारावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची थेट धमकीही त्याने दिली.
या धमकीला न घाबरता तक्रारदाराने तातडीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने १९ जून २०२६ रोजी पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान खाजगी इसम नितीन खर्डे याने तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास संमती दिल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, २२ जून रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या १० नोटांच्या स्वरूपात ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने खाजगी इसम नितीन खर्डे याला रंगेहात पकडले.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी, पोलीस हवादार संदीप वनवे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांच्या पथकाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.
या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, शासकीय कामात भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणत्याही लोकसेवकाने, अथवा त्याच्या वतीने लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,915
एसीबी नासिक एसीबी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्या तालुक्याने अत्यंत कष्टातून, घामाच्या धारा गाळून आपले वैभव उभे केले,…

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.